राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मला कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे. Sharad Pawar Coronavirus infection to Sharad Pawar, best wishes for speedy recovery from veteran leaders across the country
विशाेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मला कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
पवार यांनी ट्विट केले, “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही संसर्ग झाला होता. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या खासदार आहेत. दुसरीकडे, पवारांचे नातू रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहेत. सध्या सर्वांची प्रकृती ठीक आहे.
81 वर्षीय शरद पवार हे कोविड-विरोधी लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय व्यक्तिमत्त्व होते. लस घेतल्यावर त्यांनी या लसीकरणाच्या मोहिमेत लोकांना सहभागी होण्याचे आवाहनही केले होते.
लवकर बरे होण्यासाठी विविध नेत्यांकडून सदिच्छा
I pray for your speedy recovery @PawarSpeaks Ji. — Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) January 24, 2022
I pray for your speedy recovery @PawarSpeaks Ji.
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) January 24, 2022
पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोकांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार हे कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी ट्वीट करत सदिच्छा व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्वीट करून सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
Wishing you a speedy recovery.Get well soon @PawarSpeaks ji https://t.co/NfbsIMiBZK — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 24, 2022
Wishing you a speedy recovery.Get well soon @PawarSpeaks ji https://t.co/NfbsIMiBZK
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 24, 2022
महाराष्ट्राचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर बरे होवो ही सदिच्छा. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लिहिले की, ‘पवारसाहेब, काळजी घ्या. मी तुम्हाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत पवारांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App