विशेष प्रतिनिधी
परभणी : Ramdas Athawale शरद पवार (sharad pawar) यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ईव्हीएम विरोध मोहीमला विरोध करावा. शरद पवार आमच्या सोबत आले तर आम्हाला फायदा होईल, असे मत केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले Ramdas Athawale यांनी व्यक्त केले.
परभणी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात मागील काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनला विरोध केला जात आहे त्याविषयी शंका व्यक्त केला जात आहे. पण ईव्हीएम हे पंतप्रधान मोदी यांनी आणले नसून काँग्रेसच्या काळात ते आले आहे. ज्यावेळेस काँग्रेसला चांगले यश मिळते त्यावेळेस काँग्रेस आणि त्यांचे सहकारी ईव्हीएमला काहीच दोष देत नाहीत पण जेव्हा त्यांना अपयश येते तेव्हा मात्र ते ईव्हीएमला दोष देऊन मोकळे होतात.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या कर्नाटक मध्ये बहुमत मिळाले. त्यावेळेस मात्र काँग्रेसने ईव्हीएम विषयी एकही शब्द काढला नाही. पण आता हरियाणा महाराष्ट्र मध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले की ईव्हीएम विषयी शंका घेण्यास सुरुवात झाली आहे. हा निव्वळ पोरकटपणा आहे. जे संविधान मानत नाही, त्यांनी भारत सोडून जावं अशी माझी सूचना आहे.
परभणीतील घटनेविषयी आठवले म्हणाले, संविधानाचा अपमान झाल्यानंतर संविधान प्रेमी रस्त्यावर उतरले. कुठले ही दुकाने फुटली नाही. केवळ दुकानासमोरील बोर्ड फुटले, संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. त्याच्या मागे कोण आहे हे तपासा. मी मुख्यमंत्री यांना सांगितले होते, कोंबिंग थांबवा. पोलिसांच्या मारहाणीची चौकशी होणे गरजेचे आहे.
संसदेत आपापल्या परीने प्रश्न उपस्थित करणार, कायदा कोणी हातात घेतलेला नाही, केस वापस घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. खासगी नागरिकांनी मारहाण केली तर त्याची चौकशी पोलिसांनी करावी, पोलिसांनी तोडफोड केली असेल तर त्याची कारवाई व्हावी. राज्यात एक मंत्रिपद आणि एक विधान परिषद द्यावे अशी आमची मागणी आहे. आमचा गट ज्यांच्या सोबत आहे त्यांना सत्ता मिळते. आमची एक मंत्रिपदाची मागणी आहे, असे आठवले म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App