कसब्यातल्या पराभवाने भाजप नगरसेवकांना धडकी भरली??; की पुण्यातल्या माध्यमांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या डोक्यात हवा भरली??

विशेष प्रतिनिधी

पुणे : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देशातल्या परिवर्तनाची लाट बारामतीतून दिसली आहे. बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी देशाच्या निवडणुकीवर भाष्य करावे एवढे मोठ्ठे भाष्य कसब्याच्या स्थानिक विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर केले आहे!!, ते करताना त्यांनी देशात परिवर्तन सुरू झाल्याची नांदी झाल्याचे सांगितले आहे, पण त्याचवेळी पुण्यातील मराठी माध्यमांनी मात्र विविध आकडेवारी आणि ठोकताळे सादर करून कसब्यातल्या पराभवाने भाजपच्या 57 नगरसेवकांना धडकी भरल्याच्या बातम्या दिल्या आहेत. Sharad Pawar claimed change wave in the country after BJP kasba Byelection defeat, marathi media pumping Congress NCP ambitions for pune municipal elections

आता कसब्याच्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या नगरसेवकांना खरंच धडकी भरली आहे??, की पुण्यातल्या मराठी माध्यमांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या डोक्यात हवा भरली आहे??, हे मात्र समजायला पुणे महापालिका निवडणुकीतल्या प्रत्यक्ष निकालांची वाट पाहावी लागणार आहे!!

पण काहीही झाले तरी कसब्यात झालेला भाजपचा पराभव हा काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा पुण्यातल्या मराठी माध्यमांना अतिशय आनंददायी ठरला आहे. किंबहुना मध्यम प्रतिनिधींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. त्याचेच प्रतिबिंब कसब्याच्या सगळ्या रिपोर्टिंग मध्ये दिसले आहे. भाजपच्या 57 नगरसेवकांना धडकी भरल्याची ही त्यातलीच एक बातमी आहे!!

शरद पवारांनी जशी कसब्यातून निर्माण झालेली तथाकथित परिवर्तनाची लाट बारामतीतून “दिसली”, तशीच पुणे महापालिकेतील परिवर्तनाची लाट मराठी माध्यमातील बातमीदारांना “दिसली” आहे!!

कसब्यातून परिवर्तनाची लाट देशात पसरण्याचे भाकीत शरद पवारांनी केले आहे. ते भाकीत करताना त्यांनी पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओरिसा, तामिळनाडू, केरळ या राज्यांची यादी सादर करून त्यामध्ये कुठेच भाजप नसल्याचा दावा केला आहे.



तशीच पुण्यातल्या वॉर्ड प्रभागांची यादी सादर करून मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजपच्या 57 नगरसेवकांना धडकी भरल्याच्या बातम्या दिल्या आहेत. यात प्रामुख्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील वार्डांचा समावेश त्यांनी केला आहे. पुण्यात 162 वॉर्ड आहेत. यापैकी बहुमतासाठी 82 नगरसेवक निवडून यावे लागतात. विसर्जित झालेल्या पुणे महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक होते. यापैकी बहुतांश नगरसेवक काँग्रेस अथवा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. हाच ठोकताळा पुढे करत मराठी माध्यमांनी 57 नगरसेवकांच्या वार्डांची यादी छापून ते धोक्यात असल्याचे किंवा त्यांना धडकी भरल्याचे भाकीत केले आहे.

वास्तविक प्रत्येक निवडणूक ही स्वतंत्र असते. तिचे ठोकताळे, त्यातले मुद्दे स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत वेगवेगळे असतात. एका निवडणुकीचा दुसऱ्या निवडणुकीवर, दुसऱ्या निवडणुकीचा तिसऱ्या निवडणुकीवर परिणाम होतोच याची कोणालाही खात्री देता येत नाही. किंबहुना त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीतले प्री पोल सर्व्हे अथवा एक्झिट पोलचे अंदाज संपूर्णपणे चुकतात. पण म्हणून काही कोणी अंदाज करायचे थांबत नाही. कारण त्यातून आपल्याला हवे तसे नॅरेटिव्ह सेट करता येतात. त्यातूनच कसब्यातल्या पोटनिवडणुकीतून शरद पवारांना जशी देशातल्या परिवर्तनाची लाट “दिसली” आहे, तशीच पुण्यातील मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींना पुणे महापालिकेतल्या 57 भाजप नगरसेवकांना धडकी भरल्याची बातमी “हाती लागली” आहे. पण यामध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या डोक्यात हवा भरण्याखेरीज दुसरा कोणताही मुद्दा दिसत नाही!!

Sharad Pawar claimed change wave in the country after BJP kasba Byelection defeat, marathi media pumping Congress NCP ambitions for pune municipal elections

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात