विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे, असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी, ‘ते पुजणीय,आदरणीय, वंदनीय’ असे म्हणत “मला जास्त बोलायला लावू नका,” असा टोला शरद पवारांना लगावला. यामुळे मराठा आरक्षणावरून काका-पुतणे भिडल्याचे पाहायला मिळाले.Sharad Pawar
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने नियमात बदल करावा, अशी सूचना शरद पवारांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी शरद पवारांना त्यांच्या मागील कार्यकाळाची आठवण करून दिली. “जे लोक अशी सूचना करत आहेत, ते अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेत होते. ते पुजनीय, आदरणीय, वंदनीय आहेत, पण मला जास्त खोलात जायला लावू नका.” असा टोला अजित पवारांनी लगावला.Sharad Pawar
देवेंद्र फडणवीस एकटे पडलेले नाहीत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी आणि आपण पुण्यात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत एकटे पडल्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकटे पडले असे काहीच नाही. मी काल मुंबईतच होतो, आज फक्त एक दिवसासाठी पुण्याला आलो आहे आणि उद्या पुन्हा मुंबईला जाणार आहे.”
चर्चा केल्यावर मार्ग निघतो
मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, उषोषणाला बसतात ते आपली भूमिका मांडतात, लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिला आहे, त्यामुळे ते त्यांचे मत मांडत आहे. वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करत कसा मार्ग निघेल असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. चर्चा केल्यानंतर प्रत्येक गोष्टीवर मार्ग निघतो, हा राज्याची निर्मिती झाल्यानंतरचा आतापर्यंतचा अनुभव आहे.
नेमके काय म्हणाले होते शरद पवार?
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. “जर तामिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण देता येऊ शकते, तर घटनेत बदल करून महाराष्ट्रातील मराठा समाजालाही न्याय देता येऊ शकतो. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर घटनादुरुस्ती आवश्यक आहे,” असे विधान त्यांनी अहमदनगर येथील कार्यक्रमात केले.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट भूमिका मांडण्याचे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले की, समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन वेळप्रसंगी संसदेत घटनादुरुस्ती करणे आवश्यक आहे.असेही ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने 50-52% आरक्षण मर्यादा घालून दिली असली तरी तामिळनाडूसारख्या राज्यात 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले असल्याचे उदाहरण देत पवार यांनी मराठा आरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App