प्रतिनिधी
मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांना वगळून ही चर्चा झाल्याने बारसू प्रकल्पावर उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार?, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.Sharad Pawar barasu refinery project with chief minister eknath shinde, bypassing Uddhav Thackeray
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून बारसू रिफायनरी प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली. स्थानिक नागरिकांचा प्रकल्पाला विरोध का होत आहे? स्थानिक पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे? स्थानिकांमधील नाराजीचा सूर बदलण्यासाठी सरकार काय करणार?, या मुद्द्यांवर या दोघांमध्ये चर्चा झाली.
विशेष म्हणजे एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध वाढत असताना दुसरीकडे शरद पवार या प्रकल्पात रस घेत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना डावल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवाय आज सकाळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत आणि त्याच्यात नेमकी काय चर्चा झाली?, हे सांगितले. यावेळी पत्रकारांनी ‘मुख्यमंत्री बदलणार’ या संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर शरद पवार यांना विचारलं असता, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर मी याबाबत प्रतिक्रिया देईन, असे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App