मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी (Sharad Pawar) राजकारणाच्या निर्णायक टप्प्यावर आपणच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी ही घटना आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र “लोक माझे सांगाती” याच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या अटकळी निर्माण झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची सूत्रे शरद पवार आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्याची चिन्हे आहेत. Sharad Pawar announced his retirement from the post of NCP president
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. आपण कार्यकर्ता ते नेते कसे झाले, याची माहिती शरद पवार यांनी दिली.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एकदम अस्वस्थता निर्माण झाली आणि त्याचबरोबर शरद पवारांचा राजकीय वारस म्हणून कोण पुढे येणार?, याची देखील चर्चा सुरू झाली.
शरद पवार म्हणाले :
शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवारांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App