विशेष प्रतिनिधी
पुणे : शरद पवार यांची अखंड किंवा फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस छोटाच पक्ष असला, तरी मराठी माध्यमे शरद पवार यांना राष्ट्रीय नेताच मानतात. या “राष्ट्रीय” नेते शरद पवारांनी “स्थानिक” मावळात नुकतीच घोडदौड केली आणि “शरद पवार म्हणतात मला”, असे सांगून तिथे आपणच तिकीट देऊन आमदार केलेल्या पण सध्या अजित पवार गटात केलेल्या फर्स्ट टाइम आमदाराला पाडण्याची धमकी दिली.Sharad pawar and NCP ajit pawar MLA sunil shake threatened each other
त्याचे झाले असे :
मावळ सारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांनी सुनील शेळके या नवख्या उमेदवाराला मैदानात उतरवून मावळची जागा जिंकली, पण दरम्यानच्या काळात मावळातल्या सगळ्या नद्यांमधून भरपूर राजकीय पाणी वाहून गेले. सुनील शेळके यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली. त्यामुळे सुनील शेळके विरोधातील गटाने शरद पवारांना लोणावळ्याच्या कार्यक्रमात बोलावले. शरद पवारांच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशा धमक्या आमदार सुनील शेळके यांनी दिल्याच्या तक्रारी शरद पवारांच्या कानावर आल्या. या तक्रारीची दखल घेऊन शरद पवार यांनी सुनील शेळके यांना चांगलाच दम भरला. तुम्हाला कोणत्या पक्षाने तिकीट दिले??, कोणत्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली??, तुमच्या फॉर्मवर सही कोणी केली?? तुमचा पक्षाध्यक्ष कोण होता?? ती सही मी केली आणि म्हणून तुम्ही आमदार झालात आणि तुम्ही माझ्याच कार्यकर्त्यांना माझ्याच कार्यक्रमाला न येण्याची धमकी देता??, हे मी खपवून घेणार नाही. शरद पवार म्हणतात मला!! मी कुणाच्या वाटेला जात नाही, पण माझ्या कोणी वाटेला गेला, तर त्याला सोडत नाही, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दम भरला.
शरद पवारांनी थेट आपलेच नाव घेऊन आपल्यासारख्या फर्स्ट टाइम आमदाराला दम दिल्याचे ऐकताच सुनील शेळके भडकले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर थेट आरोप केले. मी धमकी दिलेला एक तरी कार्यकर्ता समोर आणा, नाहीतर शरद पवारांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप केले, असे सांगत मी राज्यभर फिरेन, असा प्रतिइशारा आमदार सुनील शेळके यांनी शरद पवारांना दिला.
शरद पवार आमच्यासाठी दैवत होते आणि आहेत. शरद पवारांनी माझ्यासाठी प्रचार केला. पण अजित पवारांनी मला तिकीट दिले. माझ्या मतदारसंघासाठी करोडो रुपयांचा निधी दिला म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो. त्यात माझे काय चुकले?? हे जनताच ठरवेल, पण शरद पवारांनी माझ्यासारख्या छोट्या आमदारावर आरोप करण्यापूर्वी तक्रारींची शहानिशा तरी करायला हवी होती. ती न करता त्यांनी माझ्यावर टीका केली हे चांगले झाले नाही. त्यांनी आता मी धमकी दिलेला एक तरी कार्यकर्ता समोर आणावा, अन्यथा मी शरद पवार मला खोटे धमकवतात असे सांगत राज्यभर फिरेन, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला.
शरद पवारांच्या मावळातल्या या कार्यक्रमामुळे आमदार सुनील शेळके हे एकदम राज्यभरात चर्चेत आले. ज्यांचे नावही मावळा बाहेर फारसे कोणाला माहिती नव्हते, त्या सुनील शेळके यांना शरद पवारांनी दिलेल्या एका धमकीमुळे राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनी त्याचाच फायदा घेत थेट पवारांवर प्रतिहल्ला करून घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App