विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिवाळी भेटीनंतर अजित पवारांनी राजधानी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे काल दिवसभर महाराष्ट्रात बातम्यांचा माहोल गरम होता. त्यातच आमदार रवी राणांनी भर घातली. sharad pawar and ajit pawar meeting
महाराष्ट्रात दिवाळीच्या दरम्यान मोठा राजकीय बॉम्ब फुटेल, असे भाकीत मी दसऱ्यालाच केले होते. आता तसेच घडत चालले आहे. शरद पवार 99% पटले आहेत. महाराष्ट्रात लवकरच एक स्थिर आणि मजबूत सरकार उभे राहील, असा दावा रवी राणांनी केला. पण त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत उघडपणे झालेल्या भेटींमधून कुठले बॉम्ब फुटले आहेत का आणि गुप्तपणे पेटवलेल्या वाती माध्यमांना कळले आहेत का??, असा सवाल तयार झाला आहे.
शरद पवारांची पॉवरफुल खेळी शरद पवार काहीही करू शकतात. शरद पवार यांनीच अजित पवारांना भाजपकडे पाठविले. काँग्रेसमध्ये अस्वस्थता पेरून ठेवण्यासाठी “इंडिया” आघाडीत स्वतः राहिले वगैरे बातम्यांचे पेव महाराष्ट्रात गेले तीन-चार महिने फुटत आहे.
पण प्रत्यक्षात जेव्हा अजित पवारांची बंडखोरी झाली आणि ते अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसले, त्या 3 जुलैच्या आसपास एकाही माध्यमाला त्या खऱ्या राजकीय बॉम्बस्फोटाची भनकही लागली नव्हती. अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी रुसून बसलेत, अशा बातम्या माध्यमांनी चालविल्या. पण त्या खोट्या ठरल्या. प्रत्यक्षात अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानून भाजपच्या सत्तेच्या वळसणीला येऊन बसले. त्यानंतर ही अजित पवार अर्थमंत्री पद मिळाले नाही म्हणून, पुण्याचे पालकमंत्री पद मिळाले नाही म्हणून नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या, पण प्रत्यक्षात तशी कुठलीच खरी नाराजी भाजप समोर अजित पवार प्रकट करू शकले नाहीत.
उलट शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पेक्षा फडणवीस प्रशासकीय दृष्ट्या प्रभावी राहिले आणि राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते ठरले. मात्र माध्यमांना या बातम्यांची भनकही लागली नाही.
आता जेव्हा रवी राणांसारखे आमदार राजकीय दिवाळीत फुटेल असे म्हणतात त्यावेळी मुळात भाजपला शरद पवारांसारख्या नेत्याची आता राजकीय गरज उरली आहे का??, हा कळीचा सवाल आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पराभूत होऊन शरद पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्रातला पाचव्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सिद्ध झाले. अशावेळी पवारांची मुळातच राजकीय किंमत घटली असताना भाजप त्यांना 99% पटवून आपल्या बाजूला आणण्याचा नेमका हेतू काय??, हे कोणी लक्षात घेते आहे का??, हा खरा मुद्दा आहे. केवळ काँग्रेसला खिजवायचे आणि “इंडिया” आघाडीला पटरी वरून उतरवायचे एवढाच मर्यादित उद्देश शरद पवारांच्या कथित स्वरूपात भाजपला येऊन मिळण्याने होईल.
पण उलट पवारांची विश्वासार्हता पूर्ण संपुष्टात येईल आणि महाराष्ट्रातली विरोधी पक्षांची संपूर्ण “पॉलिटिकल स्पेस” काँग्रेस सारख्या बळकट पक्षाला आयती उपलब्ध होईल ही यातली राजकीय वस्तुस्थिती आहे. मग अशावेळी रवी राणांचे वक्तव्य खरंच किती राजकीय दृष्ट्या परिणामकारक ठरू शकेल??, याविषयी शंका व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App