सत्तेच्या वळचणीला राहूनही काका – पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझड!!

Sharad Pawar

नाशिक : सत्तेच्या वळचणीला राहून देखील काका पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझडच होत असल्याचे चित्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले. सोलापूर जिल्हा आणि नवी मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून गळती समोर आली.Sharad Pawar and Ajit Pawar filed in containing splits in their party

सोलापूर जिल्ह्यात माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने, बबनदादा शिंदे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडली आणि भाजपची कास धरली. अजित पवार जरी सत्तेच्या वळचणीला गेले असले तरी ते आपल्याला मर्यादेपेक्षा पलीकडे जाऊन राजकीय फायदा देऊ शकत नाहीत हे लक्षात येताच राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे यांनी अजितदादांची साथ सोडून भाजपचे कमळ हाती धरायची तयारी चालविली. त्यांना रोखण्यासाठी अजित पवारांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूरच्या दौऱ्यावर पाठविले पण तिथे जाताच दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मुस्लिम समाजाला जवळ करा, असा संदेश दिला. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी लावलेला रेटा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले बळ लक्षात घेऊन अजित पवार यांनी स्वतः सोलापूर दौरा करायचे टाळले कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठरविल्यानंतर सोलापुरातले भाजप प्रवेश टाळणे अजित पवारांना शक्य नव्हते त्यामुळे आपण जाऊन सुद्धा आपल्या माजी आमदारांचे भाजप प्रवेश टळू शकले नाहीत, असे चित्र निर्माण होऊ नये म्हणून अजित पवार यांनी सोलापूर दौरा टाळला. स्वतःच्या ऐवजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना तिथे पाठविले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही पडझड व्हायची ती झालीच.



नवी मुंबई पवारांच्या पक्षाची नवख्याकडे धुरा

नवी मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शहराध्यक्ष मिळेना अशी स्थिती निर्माण झाली. कारण गणेश नाईक यांनी सगळी फिल्डिंग लावून उरली सुरलेली राष्ट्रवादी भाजपमध्ये आणली. त्यांचा मुलगा संजीव नाईकने राष्ट्रवादीकडून खासदारकी लढवून सुद्धा‌ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काही फायदा झाला नाही. नवी मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फारसा प्रभाव निर्माण करू शकले नाही म्हणून शरद पवारांनी अखेर डॉ. मंगेश आमले यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद सोपविले. या मंगेश आमले यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांकडे तिकीट मागितले होते. परंतु पवारांनी त्यांना ते नाकारले होते. त्यावेळी आमले यांनी अपक्ष उभे राहून फक्त 2331 मते मिळविली होती. त्या पलीकडे त्यांना कोणती झेप घेता आली नव्हती. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठला राजकीय प्रभावच उरलेला नाही. नेते देखील या क्षमतेचे उरलेले नाहीत हे लक्षात घेऊन शरद पवारांना मंगेश आमले यांच्याकडे शहराध्यक्ष पद देऊन पक्षाची शून्यातून पुनर्बांधणी करावी लागत आहे. त्यामध्ये ते किती यशस्वी होतील??, हे महापालिका निवडणुकीमध्ये सिद्ध होईल.

पडझड रोखण्यात अपयश

या सगळ्यातून एक बाब अधोरेखित झाली ती म्हणजे पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर फक्त सत्तेचे संस्कार केले. परंतु सत्तेच्या वळचणीला राहूनही त्यांचा पक्ष, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते विशिष्ट मर्यादा पलीकडे वाढू शकले नाहीत. आणि स्वतःच्या पक्षाची पडझडही रोखू शकले नाहीत.

Sharad Pawar and Ajit Pawar filed in containing splits in their party

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात