Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंढरपूरच्या एका शेतकऱ्याने शेती क्रांती करत पिकवलेल्या एका आंब्याच्या जातीला शरद पवारांचे नाव दिले. या जातीचा एक आंबा तब्बल 3 किलोचा आहे. या वजनदार आंब्याचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव दत्तात्रय घाडगे असे आहे.

दत्तात्रय घाडगे यांनी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 17 जातींचे आंबे विकसित केले. त्यासाठी ग्राफ्टिंग केले. त्यामधून ज्या विविध जाती विकसित झाल्या त्यापैकी एका आंब्याला त्यांनी संत सावतामाळी यांचे नाव दिले, तर दुसऱ्या आंब्याला शरद मॅंगो असे नाव दिले. हा शरद मॅंगो जातीचा एक आंबा तब्बल 3 किलोंचा असून तो पाहण्यासाठी परिसरातले शेतकरी दत्तात्रय घाडगे यांच्या शेतावर गर्दी करत आहेत.



शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी एक निर्णय महाराष्ट्रात फळबाग योजना लागू करायचा होता. या योजनेचा लाभ घेऊन दत्तात्रय घाडगे यांनी आपल्या शेतामध्ये अनेक प्रयोग केले. यापैकी एका प्रयोगाच्या यशस्वीतेतूनच एक वजनदार आंबा विकसित झाला. त्याला दत्तात्रय घाडगे यांनी शरद मँगो असे नाव दिले. शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करून विविध फळपिकांच्या जाती विकसित केल्या तर त्यांचे उत्पन्न वाढून प्रगती होईल, असे असा विश्वास दत्तात्रय घाडगे यांनी व्यक्त केला.

sharad mango maharashtra farmer mango weighing 3 kg and named after sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात