विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांचा गट आता उद्धव ठाकरे यांचा फॉलोवर ठरला आहे. उद्धव ठाकरेंनी जसे शिवसेना पक्ष हातातून निसटल्यानंतरही “शिवसेना” हे नाव सोडले नाही. उलट त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जोडून स्वतःचा पक्ष निवडणूक आयोगाकडून मान्य करून घेतला, तशीच राजकीय चाल शरद पवार गटाने खेळली आहे. Sharad Chandra added to the name of NCP
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला सुचविलेल्या पक्षाच्या तीन नावांच्या पर्यायांमध्ये “नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार”, “नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार” आणि “नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार” अशी नावे सुचवून आपल्या नावातला “राष्ट्रवादी” हा शब्द हटवायला नकार दिला आहे. राष्ट्रवादी या नावाचा वारसा हा खरा आपलाच आहे आणि तो आपण सोडणार नाही हेच यातून शरद पवार गटाने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक आयोगाने “नॅशनॅलिस्ट काँग्रेस शरदचंद्र” हे नाव मान्य केले आहे. पण ते 27 फेब्रुवारी पर्यंतच असेल. त्यानंतर पवार गटाला पुन्हा नवा अर्ज करावा लागणार आहे.
त्याचबरोबर पवारांचे समर्थक त्यांना ज्या नावाने संबोधतात, तो “आधारवड” या आशयाचे वटवृक्षाचे चिन्ह शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. वटवृक्षाचे चिन्ह 1952 च्या लोकसभा निवडणुकीत अखंड सोशालिस्ट पक्षाकडे होते. राम मनोहर लोहिया हे त्या पक्षाचे नेते होते. त्या पक्षाने 1952 च्या निवडणुकीत “वटवृक्ष” या चिन्हावर संपूर्ण देशभरात निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी त्या पक्षाला 10.59% मते मिळून देशभरातल्या 12 जागांवर विजय मिळवता आला होता. पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्यावेळी काँग्रेसला 364 जागा मिळाल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App