विशेष प्रतिनिधी
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंड हे स्वार्थासाठी आहे असे म्हणत शालिनीताई पाटलांनी शरद पवारांची पाठराखण जरूर केली, पण त्याचवेळी 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे सांगून त्यांनी पवारांची विकेटही काढली!! Shalinitai patil targets ajit pawar but praise devendra fadnavis, takes wicket of sharad pawar
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या मेळाव्यात शरद पवारांवर टीका करताना वसंतदादा पाटलांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसल्याचा हवाला दिला होता. मी 60 वर्षी निर्णय घेतला, पण वरिष्ठांनी 38 व्या वर्षी निर्णय घेऊन वसंतदादा पाटलांसारख्या चांगल्या नेतृत्वाला हटविले, अशी टीका अजित पवारांनी केली होती. अजित पवारांच्या या टीकेला शालिनीताई पाटलांनी प्रत्युत्तर दिले.
अजित पवारांनी स्वार्थासाठी बंड केले आहे. त्यांना भ्रष्टाचाराचा आरोप खाली तुरुंगात जायची भीती वाटत असल्याने त्यांनी आपल्या काकांचा विश्वासघात केला आणि ते सरकारमध्ये निघून गेले, पण तरीदेखील 2024 मध्ये त्यांची अवस्था अब्दुल रहमान अंतुले यांच्यासारखी होईल. 2024 मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असेही शालिनीताईंनी सांगितले.
अजित पवारांनी शालिनीताई यांचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावर वाद आहे. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संबंधित संबंधित असलेल्या गुरु कमोडिटीजने कवडीमोल गावात खरेदी केल्याचा आरोप पाटलांनी केला. त्याविरुद्ध आजही सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. याच केस मध्ये ईडीने मध्यंतरी अजित पवारांच्या बहिणीच्या घरांवर छापेही घातले होते.
या पार्श्वभूमीवर पूर्वी शरद पवारांवर थेट शरसंधान साधत असलेल्या शालिनीताई आता अजित पवारांवर शरसंधान साधून शरद पवारांची बाजू उचलून धरताना दिसतात. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांना बाजूला सारून ते मुख्यमंत्री झाले, पण त्यावेळी काँग्रेस आमदार इतरत्र जाण्याचा विचार करत होते म्हणून त्यांनी तसे केले, असा दावाही शालिनीताई पाटलांनी केला.
त्याचवेळी शालिनीताईंनी अजित पवारांचा अब्दुल रहमान अंतुले होईल, असा इशारा दिला. अंतुले यांनी मुख्यमंत्री झाल्यावर इंदिरा गांधींच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून स्वतःच 5 कोटी रुपये खाल्ले. या भ्रष्टाचाराची माहिती आपणच इंदिरा गांधींना दिली. त्यावेळी आंदोलनचा इंदिरा गांधीं समोर काय थयथयाट झाला होता, हे आपण पाहिल्याचे शालिनीताई पाटील म्हणाल्या. अजित पवारांची अवस्था तशीच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
पण या सर्व वक्तव्यातून शालिनीताई पाटलांनी शरद पवारांची पाठराखण केली असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात 2024 मध्ये देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य करून शालिनीताईंनी शरद पवारांची ही विकेटच काढली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App