पिंपरी चिंचवडच्या विकासाचे सारथी लक्ष्मण जगताप यांच्या शक्तिस्थळ’चे लोकार्पण

विशेष प्रतिनिधी

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे ‘दिवंगत आमदार लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप शक्तिस्थळ’चे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण केले.Shaktisthal’ of Laxman Jagtap, the charioteer of Pimpri Chinchwad’s development

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण आपोआप होते. ते मातीतून घडलेले नेतृत्व होते. तरुण वयात राजकारणात प्रवेश करून नगरसेवक पदापासून त्यांनी आपला प्रवास सुरु केला व शहराच्या विकासासाठी सतत झटत राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडमध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि सामान्य माणसाच्या जीवनमानात दूरगामी बदल घडून आले.



मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आमदार म्हणून विधान परिषद आणि विधानसभेमार्फत त्यांनी शहराच्या विकासासाठी सातत्याने संघर्ष केला. रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, इंद्रायणी नदी सुधारणा, पाणीपुरवठा योजना, कचऱ्यापासून वीजनिर्मिती यांसारख्या अनेक विकासकामांमध्ये त्यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसते. त्यांच्या कार्यामुळे पिंपरी चिंचवडचा चेहरा बदलला असून अनेक प्रकल्प आज पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजारपणातही कर्तव्याला प्राधान्य देत विधान परिषदेत मतदानासाठी आलेल्या लक्ष्मणभाऊ यांची निष्ठा आणि ध्येयवाद अविस्मरणीय आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी त्यांच्या कार्यामुळे ते आजही आपल्यात जिवंत आहेत.

त्यांनी पाहिलेली पिंपरी चिंचवडच्या विकासाची स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आज लोकार्पण झालेले ‘शक्तिस्थळ’ पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी सदैव प्रेरणा देत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.

Shaktisthal’ of Laxman Jagtap, the charioteer of Pimpri Chinchwad’s development

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात