भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील या विधेयकाचे स्वागत करत भाजपच्या संघर्षाला यश मिळाले, असे म्हंटले आहे.’Shakti Act’ Bill passed, I welcome this Act ‘- Laxman Jagtap
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती ‘ कायदा एकमताने मंजूर झाला.
विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील या विधेयकाचे स्वागत करत भाजपच्या संघर्षाला यश मिळाले, असे म्हंटले आहे.
ट्विटमध्ये जगताप म्हणाले की,’गेल्या काही महिन्यांपासून वारंवार उघडकीस येणाऱ्या अत्याचारांच्या नृशंस घटनांना आळा घालण्यासाठी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘शक्ती कायदा’ विधेयक मंजूर झाले, या कायद्याचे मी स्वागत करतो. यासाठी भारतीय जनता पार्टीने केलेल्या संघर्षाला यश मिळाले.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App