ड्रग्ज घेणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी शाहरुख आर्थर रोड कारागृहात, हायकोर्टातून जामीन मिळवण्यासाठी 7 दिवस हातात

प्रतिनिधी

मुंबई : ड्रग्जप्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज तुरुंगात पोहोचला. त्याने आर्यनची 15 मिनिटे भेट घेतली. आर्यनच्या अटकेनंतर दोघे पहिल्यांदा भेटले आहेत. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी आर्यन खानचा जामीन अर्ज बुधवारी पुन्हा फेटाळण्यात आला. आर्यनचे वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे जामिनासाठी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या न्यायालयात पोहोचले, पण तोपर्यंत उच्च न्यायालयाचे खंडपीठ उठले होते.shah rukh khan reaches arthur road jail to meet son aryan khan

आता ही सुनावणी गुरुवारी होणार आहे. तथापि, त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळवणे सोपे असणार नाही, कारण न्यायालयाला 1 नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्या आहेत आणि फक्त 7 कामकाजाचे दिवस आहेत. 14 नोव्हेंबरनंतरच न्यायालये पुन्हा सुरू होतील.



मुलाच्या भेटीला शाहरुख खान पोहोचला

शाहरुख खान गुरुवारी सकाळी त्याचा मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोडवर पोहोचला. दोघांची भेट सुमारे 15 मिनिटांची होती. संभाषणादरम्यान, वडील आणि मुलगा यांच्यामध्ये काचेची भिंत होती. दोघांनी इंटरकॉमवर संवाद साधला. या भेटीवेळी जेलचे अधिकारीही उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कारागृहांमध्ये कोरोनामुळे कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना समोरासमोर भेटण्याची परवानगी नाही. ही बंदी बुधवारीच उठवण्यात आली. अशा परिस्थितीत शाहरुख खान लगेच मुलाला भेटायला पोहोचला. आर्यन व्यतिरिक्त इतर कैद्यांचे नातेवाईकही त्याला भेटायला आले आहेत. आर्थर रोडने समोरासमोर भेटण्याची परवानगी देण्याबाबत नोटीसही जारी केली आहे.

याआधी शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे आर्यनशी व्हिडिओ कॉलवर बोलले होते. साहजिकच, दोघेही आपल्या ड्रग्ज घेणाऱ्या मुलाच्या अटकेमुळे काळजीत आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांकडून त्याच्या आरोग्याविषयी माहिती घेत राहतात, असेही सांगितले जात आहे. शाहरुख तुरुंगात जातानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल

आर्यन खान गेल्या 14 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. एनसीबीने त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिकिंगशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. आर्यन खानची जामीन याचिका दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. आता त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, आर्यन खानची न्यायालयीन कोठडी संपणार आहे, अशा परिस्थितीत एनसीबी पुन्हा एकदा त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करणार आहे. एनसीबी उच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यास तयार आहे. असे मानले जाते की, आर्यन खानला जामीन मिळण्याची शक्यता कमीच आहे.

shah rukh khan reaches arthur road jail to meet son aryan khan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात