मुंबईच्या शबनम शेखची मुंबई ते अयोध्या पायी वारी; मंदिराच्या उद्घाटनानंतर मस्तक टेकवणार रामचरणी!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : अयोध्येचा राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जवळ येत असताना देशभर प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे या उत्साहाच्या वातावरणात अनेक जण आपला वैयक्तिक उपक्रमही करत आहेत असाच एक अनोखा उपक्रम मुंबईच्या शबनम शेख ने सुरू केला आहे मूळची नालासोपारा येथे असलेली शबनम शेख अयोध्येच्या पायी वारीला निघाली आहे.Shabnam sheikh going to ayodhya on foot



शबनम शेख ने नाशिकच्या काळाराम मंदिरात काळा रामाचे दर्शन घेतले आणि तिने अयोध्येकडे प्रस्थान ठेवले आहे. मी एक सनातनी आहे आणि मुस्लिम भाविक देखील आहे रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेचा देशात प्रचंड उत्साह आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी अयोध्येला पायी जाण्याची माझ्या मनात प्रेरणा आल्याने मी अयोध्येची पायी वारी करत आहे, असे तिने सांगितले.

शबनम दररोज 25 ते 30 किलोमीटर चालते. ती नेमकी केव्हा अयोध्येला पोहोचेल, याची माहिती तिला नाही. पण 22 जानेवारीपूर्वी आपण तिथे पोहोचू शकणार नाही, असे तिने सांगितले. त्यामुळे 22 जानेवारी नंतरच ती अयोध्येला पोहोचून श्रीरामल्लांच्या चरणी मस्तक टेकवणार आहे.

एक मुस्लिम युवती अयोध्येच्या पायी वारीला निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या शहरांमधले लोक मला ओळखू लागले आहेत, ते पुढे येऊन मला मदतही करत आहेत. त्यामुळे माझा उत्साह वाढला आहे, असे तिने आवर्जून सांगितले.

Shabnam sheikh going to ayodhya on foot

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात