मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू, २८ जखमी

मृतांची संख्या वाढण्याची भीती, अनेकजण जखमी झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

धुळे : मुंबई-महामार्गावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पळासनेर गावाजवळ आज एक भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव  कंटनेरचा ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्यालगतच्या एका छोट्या हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात सात जणांचा घटनास्थळीच मृत्य झाला आहे, तर अनेकजण  जखमी झाले आहेत. Seven people dead and 28 others were injured after a container hit several vehicles and later got overturned

मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.  मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला.

कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात प्राप्त  माहितीनुसार ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास २८ जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे.

Seven people dead and 28 others were injured after a container hit several vehicles and later got overturned

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात