प्रतिनिधी
नांदेड : राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन नागरिकांना सप्टेंबरमध्ये सण मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा योग आला आहे. त्यामुळे सप्टेंबर हा विविध सण उत्सवाचा महिना ठरणार आहे.September festival, festive; Decorative materials for various festivals flourished in the market
शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा ५ तारखेला आहे. वर्षभर शेतात काम करणाऱ्या बैलजोडीस एक दिवस विश्रांती मिळते. बैलांना सजावट करून गावात फिरवून सायंकाळी उत्साहात बैलजोडीची पूजा करतात. मानाचा पुरणपोळी नैवेद्य दिला जातो. ९ सप्टेंबर रोजी महिला हरितालिका सण, महादेवाची पूजा विविध वनस्पतीचा वापर करून साजरा करतात.
१० सप्टेंबर रोजी गणरायाची मोठ्या प्रमाणात घरोघरी स्थापना केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सार्वजनिक गणेत्शोत्सव साजरा करता येत नाही. सलग दहा दिवस गणरायाचा हा महत्त्वाचा सण साजरा करण्यात येतो. १९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला गणरायाचे विसर्जन करण्यात येते.
११ सप्टेंबर रोजी ऋषिपंचमीपासून जैन बांधवाचा पर्युषण पर्वास सुरुवात होते. दररोज जैन मंदिरात अभिषेक, पूजा, आरती, प्रवचन सायंकाळी आरती व प्रवचन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अनंत चतुर्थी चढाव अभिषेक व पौर्णिमेस पर्युषण पर्वाची सांगता होते.
विविध सणांचे सजावट साहित्य विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. सलग दहा दिवस जैन बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपवास करतात.१२ सप्टेंबर रोजी महिला मंडळी घरोघरी मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस ज्येष्ठा गौरीचे आवाहन करून हा सण साजरा करणार आहेत.
१२ सप्टेंबर रोजी घरोघरी सायंकाळी गौरीचे आगमन होईल. १३ सप्टेंबर रोजी गौरी पूजन, १४ सप्टेंबर रोजी घरोघरी गौरी पाहण्याचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यात हळदी कुंकुवाचे आयोजन करण्यात येते. रात्री गौरीस निरोप दिला जाणार आहे.
एकंदरीत आगामी सप्टेंबर महिन्यात बैलपोळा, हरितालिका, ऋषी पंचमी, गणेश उत्सव, जैन समाजाचा पर्युषण सण, ज्येष्ठा गौरी सण आदी सण साजरे करण्यात येणार आहेत. नागरिकांना गतवर्षी कोरोनामुळे सण साजरे करता आले नाहीत. आगामी सप्टेंबर महिन्यात पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे .
त्यामुळे आगामी सण हे राज्य सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून घरोघरी आपल्या कुटुंबातील मंडळी सण साजरा करतील असे दिसते. आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे आज गरजेचे बनले असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App