निमित्त होते रमाकांत खलप यांच्या पंचाहत्तरीचे. यावेळी जमलेले ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खलप यांनी गोवा कॉंग्रेसचे नेतृत्त्व करावे अशी गळ घातली. Senior Congress leaders of Maharashtra urged Ramakant Khalap to contest upcoming Goa elections from Congress
विशेष प्रतिनिधी
पुणे : गोव्याची विधानसभा निवडणूक पाच महिन्यांवर आली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत कॉंग्रेसला गोव्यात मजबूत करण्यासाठी रमाकांत खलप यांनी मैदानात उतरावे. रमाकांत खलप यांच्याइतका सुसंस्कृत आणि लोकप्रिय माणूस दुसरा कुणी नाही. तुमच्यासाठी आम्ही दिल्लीतही जाऊ, असे आश्वासन देत ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी माजी केंद्रीय कायदेमंत्री ॲड रमाकांत खलप यांना कॉंग्रेस प्रवेशाचे निमंत्रण दिले.
त्यावर खलप यांनी लागलीच प्रत्युत्तर दिले. खलप म्हणाले की, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २२ आमदार असतानाही काँग्रेसच्या राज्यपालांनी मला मुख्यमंत्री होऊ दिले नव्हते. त्यानंतर लोकसभेला तिकीट देतो, विधानसभेला देतो, असे काँग्रेसने अनेकदा सांगितले. पण तिकीट दिलेच नाही. आता हा प्रसंग पुन्हा येतोय. तिकीट मिळेल की नाही माहिती नाही. ॲड खलप पुढे म्हणाले की, जे करायला हाती घेतले ते झाले नाही. पण, पुण्यातून लोकसभेत पाठवले, तर कदाचित हे स्वप्न पूर्ण होईल. त्यावर एकच हशा पिकला.
निमित्त होते विखे पाटील फाऊंडेशन, संवाद पुणे आणि महाराष्ट्र कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने गोव्याचे माजी मुख्यमंत्री ॲड खलप यांच्या अमृत महोत्सवी गौरव समारंभाचे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ॲड खलप यांचा फुले पगडी आणि मानपत्र देऊन सत्कार झाला. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विखे पाटील फाऊंडेशनचे अशोक विखे पाटील, संवादचे सुनील महाजन आणि महाराष्ट्र कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर आदी उपस्थित होते.
मधुकर भावे यांनी गोव्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे उतरावे असा सल्ला ॲड. खलप यांना दिला. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात त्याला दुजोरा दिला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, ॲड. खलप यांनी गोव्याची निवडणूक लढवावी. वेळ पडली तर त्यांच्यासाठी आम्ही दिल्लीला जाऊ. सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना खलप म्हणाले की, माझी जडणघडण महाराष्ट्राच्या संत साहित्यातून झाली. महाराष्ट्रात माझा असा सत्कार घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. महाराष्ट्राचे गोव्यावर उपकार आहेत. महाराष्ट्र हा गोव्याचा थोरला बंधू आहे. संपूर्ण महाराष्ट्र मला रामासारखा आहे, मी भरत होऊ इच्छित आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App