ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण-2023’ पुरस्कार प्रदान!

भारतीय चित्रपटसृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या कलावंतांचा सन्मान, केल्याची फडणवीसांनी व्यक्त केली भावना


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र राज्य 57 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा’ काल पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री दीपक केसरकर, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.Senior Actor Ashok Saraf Awarded Maharashtra Bhushan 2023



यादरम्यान मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण-2023’ आणि गायक सुरेश वाडकर यांना प्रतिष्ठित गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार-2022 ने सन्मानित केले. याशिवाय आजच्या समारंभात अनेक अभिनेते/अभिनेत्री, दिग्दर्शक, गायक यांचाही सन्मान केला गेला.

या सोहळ्याबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘चित्रपटसृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या या कलावंतांना सन्मानित करून आनंद झाला. अभिनेते अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा आहेत. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, टेलिव्हिजन व नाटक या क्षेत्रांमध्ये अधिकारशाही गाजवत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तर गायक सुरेश वाडकर यांचा 25 वर्षांपूर्वीचा आवाज आजही अगदी तसाच आहे.’

याशिवाय ‘या सर्व पुरस्कार विजेत्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य केले. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची ओळख तर आहेच, शिवाय भविष्यात तरुण प्रतिभावान कलाकारांनाही चांगले काम करण्यासाठी तो प्रेरणा देत राहील. सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो !’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

🏆चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार:
स्व. अभिनेते रवींद्र महाजनी (2020)
अभिनेत्री उषा चव्हाण (2021)
अभिनेत्री उषा नाईक (2022)

🏆चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार:
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे (2020)
गायक रवींद्र साठे (2021)
दिग्दर्शक नागराज मंजुळे (2022)

🏆दिवंगत राज कपूर जीवन गौरव पुरस्कार:
अभिनेत्री अरुणा इराणी (2020)
अभिनेते मिथुन चक्रवर्ती (2021)
अभिनेत्री हेलन (2022)

🏆दिवंगत राज कपूर विशेष योगदान पुरस्कार:
दिग्दर्शक जे.पी. दत्ता (2020)
गायक सोनू निगम (2021)
दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (2022)

Senior Actor Ashok Saraf Awarded Maharashtra Bhushan 2023

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात