विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती धरल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप आला. त्यांच्याबरोबर 10 11 आमदार भाजपमध्ये येण्याच्या चर्चा माध्यमांनी सुरू केल्या. आपापल्या वकुबानुसार माध्यमांनी आमदारांची यादी देखील प्रसिद्ध केली. यात प्रणिती शिंदे, राजू आवळे, सतेज पाटील विश्वजीत कदम आदी आमदारांची नावे प्रसिद्ध केली. Second political earthquake in Congress in Rajya Sabha polls
पण प्रत्यक्षात या मधल्या काही आमदारांनी पत्रकार परिषदा घेऊन आपण काँग्रेसचीच एकनिष्ठ असल्याचा पुकारा केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी अशोक चव्हाण सोडून बाकी नेत्यांचे ऐक्य दिसले.
पण मूळात भाजपने काँग्रेसमध्ये जी सुरुंग पेरणी करून ठेवली आहे, तिचा महास्फोट येत्या एक-दोन दिवसांपेक्षा प्रत्यक्ष राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात होण्याची दाट शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांचा तसाच अनुभव आहे. त्या निवडणुकांमध्येच त्या वेळच्या अखंड शिवसेना, अखंड राष्ट्रवादी आणि अखंड काँग्रेस या तिन्ही पक्षांत सुरुंगाचे राजकीय स्फोट झाले होते आणि भाजप प्रणित सगळे उमेदवार निवडून आले होते.
या फेब्रुवारी 2024 महिन्याच्या अतिरिक्त होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत देखील याचे अत्यंत येण्याची शक्यता आहे. त्यावेळी मतदानात काँग्रेस मधले भूकंप काँग्रेसमध्ये भाजपने पेरलेले सुरुंग फुटून प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल आहे. निकालात काँग्रेसमध्ये पेरलेल्या सुरुंगाच्या स्फोटाचा परिणाम दिसेल. काँग्रेसचे नेमके किती आमदार फुटले ही संख्या स्पष्ट होईल.
तत्पूर्वी माध्यमे आपापल्या वकुबानुसार काँग्रेस मधल्या फुटीच्या आणि आमदारांच्या नावांच्या बातम्या पेरत राहतील. आमदार त्यावर खुलासे करणाऱ्या पत्रकार परिषदा घेत राहतील आणि प्रत्यक्ष राज्यसेवा निवडणुकीनंतरच त्याचा खरा परिणाम दिसेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App