प्रतिनिधी
मुंबई : भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या ऐक्याचा आज दुसरा अंक मुंबईत सादर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांची मुंबईत आज रात्री “डिनर डिप्लोमसी” रंगणार आहे. केसीआर चंद्रशेखर राव हे शरद पवार यांची देखील भेट घेणार असून आपल्या मुंबई भेटीमध्ये ते भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय ऐक्याची बांधबंदिस्ती करणार आहेत. Second issue of unity of anti-BJP CM today: Uddhav Thackeray – KCR Chandrasekhar Rao’s dinner diplomacy in Mumbai !!
गेल्याच महिन्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईत येऊन शरद पवारांना भेटून गेल्या आहेत. त्यावेळी सिल्वर ओकच्या पोर्चमध्ये उभे राहून यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे अस्तित्व पुसून टाकले होते. मात्र त्यानंतर काँग्रेसने आक्रमक होत प्रादेशिक पक्षांच्या ऐक्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता.
या पार्श्वभूमीवर केसीआर चंद्रशेखर राव हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याबरोबर तेलंगण मधले शिष्टमंडळ असेल. उद्धव ठाकरे यांनी त्यांना रात्रीच्या भोजनासाठी निमंत्रण दिले आहे. या मध्ये शरद पवार देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. भाजपा विरोधातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे ममता बॅनर्जी आणि केसीआर चंद्रशेखर राव यांचेही समांतर प्रयत्न सुरू आहेत आणि या दोन्ही प्रयत्नांमध्ये उद्धव ठाकरे सामील होताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App