Prakash Ambedkar : देशातील ओबीसीसह एससी, एसटी आरक्षण संकटात, जरांगेंच्या मागणीला विरोध करा, प्रकाश आंबेडकरांचे भाजपला आव्हान

Prakash Ambedkar

विशेष प्रतिनिधी

बीड : Prakash Ambedkar विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे प्रचार सभा पार पडली. वंचितचे उमेदवार शेख मंजुर चाँद साहब यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत थेट भाजपला आव्हान दिले आहे.Prakash Ambedkar



देशातील ओबीसी आरक्षण संकटात

सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातील ओबीसी आरक्षण संकटात आहे, याच सोबत एससी आणि एसटीचे आरक्षण देखील संकटात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात एससी आणि एसटी आरक्षणात क्रिमिलेअर टाकण्यात आले आहे. यामुळे एका कुटुंबात एकाच व्यक्तीने एकदा आरक्षणाचा लाभ घेतल्यास ते कुटुंब क्रिमिलेअरमध्ये येते. क्रिमिलेअरमध्ये जो असेल त्याला आरक्षण लागू होणार नाही. हे तुम्हाला मंजूर आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुढे ते म्हणाले, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेने आरक्षणाबाबतच्या निर्णयाला पाठिंबा दिला, नवी समिती स्थापन केली, तुम्ही त्यांना मतदान दिले तर ते काय करतील? असा देखील प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकरांनी दिले भाजपला आव्हान

मनोज जरांगे यांच्या मागणीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध आहे अशी भूमिका घ्यावी. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी आहे त्याला विरोध आहे हे जाहीरपणे सांगावे. मात्र, भाजप यावर काय म्हणते? जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याला पाठिंबा आहे. तुमचा पाठिंबा आहे तर आमचे वाटोळे का करून घ्यायचे आहे? असा प्रश्न ओबीसी समाज विचारत आहे.

ओबीसी आरक्षण कसे वाचवणार?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसी समाज म्हणतोय आमचे वाटोळे करून का घेऊ? महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी ओबीसी समाजाला प्रतिनिधी दिला नाही. हे लक्षात घ्या, विधानसभेत आमदार पाठवायचा असेल अत्र उमेदवार पाहिजे. उमेदवार नाही तर आमदार कसा जाणार, तिथे निर्णय घेतला तर ओबीसी आरक्षण कसे वाचवणार? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.

SC, ST reservation crisis in the country along with OBCs, oppose the demands of Jarangs, Prakash Ambedkar’s challenge to BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात