सावरकर किंवा संघाचा कार्यक्रम असता तर पवारांना न जाण्याची विनंती केली असती; रोहित पवारांचे वादग्रस्त वक्तव्य

प्रतिनिधी

पुणे : लोकमान्य टिळक सन्मान पुरस्काराचा कार्यक्रम हा पूर्णपणे वेगळा आहे. त्याला शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर व्यासपीठावर हजर राहणे ही वेगळी बाब आहे. तिथे सावरकर किंवा संघाचा कार्यक्रम असता, तर आपण पवारांना त्या कार्यक्रमाला न जाण्याची विनंती केली असती, असे वादग्रस्त वक्तव्य शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केले आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्यातून महाराष्ट्रात नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.Savarkar or Sangh programme, Pawar would have been requested not to go; Rohit Pawar’s controversial statement

लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर व्यासपीठावर बसू नये, असा आग्रह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी घेतला धरला आहे. संजय राऊत, वर्षा गायकवाड, वंदना चव्हाण आदी नेत्यांनी शरद पवारांना मोदींबरोबर व्यासपीठावर न बसण्याची विनंती केली आहे.



या पार्श्वभूमीवर रोहित पवारांना आपणही शरद पवारांना अशीच विनंती करणार का??, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना रोहित पवारांनी बचावात्मक भूमिका घेतली. लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम वेगळा आहे. तो सावरकर किंवा संघाचा कार्यक्रम असता तर त्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी पवार साहेबांना विनंती केली असती. पण हा कार्यक्रम वेगळा आहे. त्यामुळे ते मोदी साहेबांबरोबर व्यासपीठावर बसणार आहेत, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले.

पण त्याचवेळी पवार साहेबांनी मोदी साहेबांना मणिपूर मधल्या परिस्थितीची महाराष्ट्रातल्या परिस्थितीची जाणीव करून द्यावी. केंद्र सरकार गुजरातला प्राधान्य देऊन महाराष्ट्रावर अन्याय करत आहे, असे सांगावे अशी विनंती आपण पवार साहेबांना करू, असे वक्तव्यही रोहित पवारांनी केले.

रोहित पवारांच्या या वक्तव्यातून मात्र मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. कारण लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम होत असताना कोणत्याही नेत्याने सावरकरांचा विषय मध्ये आणला नव्हता, तो विषय रोहित पवारांनी आपल्या वक्तव्यातून पुढे सरकावला आहे. आता त्यावर शरदनिष्ठ राष्ट्रवादीतून तसेच विरोधकांकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Savarkar or Sangh programme, Pawar would have been requested not to go; Rohit Pawar’s controversial statement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात