१९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये होतं सावरकरांचे वास्तव्य ..
विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी आणि ओजस्वी स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर … यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहातील खोली सावरकर जयंतीनिमित्त येत्या रविवारी २८ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे..Savarkar Jayanti, the hostel room of Fergusson College is open to the general public.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना सन १९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये रहात होते. त्यांच्या वापरातील विविध वस्तूंचे या ठिकाणी जतन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App