MLA Satej Patil : आमदार सतेज पाटील म्हणाले- असदुद्दीन ओवेसींचा ध्रुवीकरणाचा अजेंडा; कोल्हापूरचे वातावरण बिघडवण्याचे काम करू नये

MLA Satej Patil

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : MLA Satej Patil  एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी आज, 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ओवेसी हे भडकाऊ भाषणे करतात, त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.MLA Satej Patil

असदुद्दीन ओवेसींच्या या दौऱ्यात कोल्हापुरातील बागल चौकात एमआयएमच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, पत्रकार परिषद आणि इचलकरंजी येथे जाहीर सभा होणार आहे. विरोधामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनी बागल चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.MLA Satej Patil



ओवेसी यांचा ध्रुवीकरणाचा अजेंडा- आमदार सतेज पाटील

यावर काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ओवेसी यांचा पहिल्यापासून ध्रुवीकरणाचा अजेंडा आहे. मात्र, कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे. त्यांचे हे ध्रुवीकरण इथे चालणार नाही. कोल्हापुरात एक चांगले वातावरण आहे. ते बिघडवण्याचे काम ओवेसींनी करु नये.

आमदार पाटील यांनी राज्य सरकारच्या महापुरग्रस्तांबाबत असलेल्या भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्याला ज्या पद्धतीने मदत हवी आहे ती मिळत नाही. राज्य सरकारची उदासीनता असून केवळ कागदे नाचवणे सुरु आहे. सरकारने मदतीबाबत टाकलेल्या अटी रद्द करुन सरसकट शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे अशी मागणी सतेज पाटलांनी केली आहे.

मराठवाड्याच्या मदतीला कोल्हापूर

दरम्यान, सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा आवाहन केले होते. त्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्याकडे आज पाठवण्यात आली. कसबा बावडा, भगवा चौक येथील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीची ही वाहने मराठवाड्याकडे रवाना झाली आहेत.

पुरामुळे जनजीवन उध्वस्त झालेल्या मराठवाड्याला मदत करण्यासाठी धान्यासह किराणा सामान, प्रथमोचार साहित्य, सॅनिटरी पॅडस, चप्पल, पाणी बॉटल्स, कपड्यांपासून ते ब्लँकेटस, चटईपर्यंत कोल्हापुरातील प्रत्येकान आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला. यातून तब्बल 27 टेम्पो भरुन गोळा झालेली मदत सोमवारी खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याकडे पाठवण्यात आली. कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन 25 टेम्पो मराठवाड्याकडे रवाना झाले.

MLA Satej Patil: Owaisi’s Polarization Agenda Should Not Harm Kolhapur Atmosphere

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात