सातारा विभागातील २८ एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. Satara: More than २०० employees present at work; Office resumes
विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्या पंधरा वीस दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.एसटीच्या सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, दहिवडी, कोरेगाव, मेढा, वडूज, फलटण या ११ आगारांतील कर्मचारी संपावर गेले आहेत.
दरम्यान सातारा विभागातील २८ एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.यावेळी सातारा विभागीय कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व आगारांत तब्बल २०० हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले असल्याने कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की , सातारा विभागाने १८८ कर्मचाऱयांना कामावर उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, कर्मचारी नोटीस घेऊनही कामावर उपस्थित राहणार नसतील तर त्यांच्यावर महामंडळामार्फत निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App