Sarpanch Deshmukh murder case : सरपंच देशमुख हत्येप्रकरणी आरोपींच्या स्कॉर्पिओ कारमध्ये सापडले 19 पुरावे; तिघांनी दिली खुनाची कबुली

Sarpanch Deshmukh murder case

प्रतिनिधी

बीड : Sarpanch Deshmukh murder case सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या‎प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या काळ्या‎स्कॉर्पिओत एकूण १९ पुरावे सीआयडीला‎आढळले आहेत. कारचा फॉरेन्सिक‎तपासणी अहवाल आला असून डाव्या‎दरवाजाच्या काचेवरील दोन ठसे आरोपी‎सुधीर सांगळेचे असल्याचे समोर आले‎अाहे. या गुन्ह्यातील आरोपी जयराम चाटे, ‎‎महेश केदार आणि सुदर्शन घुले या तिघांनी ‎‎पुण्याच्या मॅजिस्ट्रेटसमोर कबुली जबाब‎दिला होता. त्यांच्या कबुलीजबाबाची प्रत ‎‎आरोपीच्या वकिलांना दिली आहे.‎Sarpanch Deshmukh murder case

या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या‎एमएच ४४ झेड ९३३३ या क्रमांकाच्या‎काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची फॉरेन्सिक ‎‎तपासणी करण्यात आली. डाव्या बाजूच्या ‎‎काचेवर दोन ठसे आढळले. ते आरोपी‎सुधीर सांगळे याचे असल्याचे समोर आले.‎



आंधळेला अटक करा, सर्व‎आरोपींना फाशी द्या- देशमुख‎

चार महिन्यांनंतर संतोष देशमुख यांच्या‎हत्येची आरोपींनी कबुली दिली आहे.‎आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करा‎तसेच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा‎द्यावी, अशी मागणी धनंजय देशमुख‎यांनी केली आहे.‎

मॅजिस्ट्रेटसमोर कबुलीमुळे‎केस संपल्यात जमा- दमानिया‎

सुदर्शन घुलेने देशमुख हत्या‎प्रकरणी पोलिसांपुढे कबुली दिली असेल‎तर ग्राह्य धरली जात नाही. मॅजिस्ट्रेटपुढे‎दिली तर केस संपल्यात जमा आहे.‎कलम १६४ नुसार जर कबुली दिली‎असेल तर चांगलेच आहे, अशी‎प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली‎दमानिया यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या‎की, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळ,‎राजेश पाटील, प्रशांत महाजन हे पोलिस‎अधिकारीदेखील आरोपींच्या संपर्कात‎होते. या सर्वांना सहआरोपी करावे. ते‎धनंजय मुंडे यांना छुपी मदत करत होते.‎हत्येचा सूत्रधार वाल्मीक कराड होता‎असे चार्जशीटमध्ये येत नाही तो पर्यंत‎त्यांना फाशीची शिक्षा होणार नाही, असे‎दमानिया यांनी सांगितले.‎

देशमुखांना २ तास मारहाण‎

घटनेच्या दिवशी ९ डिसेंबरला ३ वाजून‎४६ मिनिटांनी आरोपींनी मारहाण‎करायला सुरुवात केली होती, तर‎शेवटचा व्हिडिओ हा ५ वाजून ५३‎मिनिटांचा आहे. त्यानंतर काही वेळाने‎देशमुख यांचा मृत्यू झाला. आरोपींनी‎देशमुखांना २ तास ७ मिनिटे म्हणजे १२७‎मिनिटे मारहाण केल्याचे स्पष्ट होते.‎

मॅजिस्ट्रेटसमोर कबूलनामा‎

आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि‎सुदर्शन घुले यांना पुण्यात अटक केली‎होती. सीआयडीने सेक्शन १८ प्रमाणे‎तिघांना पुण्याच्या मॅजिस्ट्रेटसमोर हजर‎करून कबुलीजबाब घेतले होते. हे जबाब‎‎बंद पाकिटातून विशेष सरकारी वकिलांना‎पाठवण्यात आले होते. त्यांची प्रत‎आरोपींच्या वकिलांना दिली आहे.‎

19 pieces of evidence found in the Scorpio car of the accused in the Sarpanch Deshmukh murder case;

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात