विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड मधील संतोष देशमुख प्रकरणामुळे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मारलेला बाण अचूक लागला, पण तरीदेखील या प्रकरणात कुठलीही कारवाई न करून उपमुख्यमंत्री अजित पवार अजून नामानिराळेच राहिलेत. पण हे प्रकरण वाढवून थेट आपल्यापर्यंत येईल हे लक्षात येताच अजितदादांनी आपल्या प्रवक्त्यांना कामाला लावत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करायला लावला.
संतोष देशमुख प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय आमदार एकवटले त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोर्चे काढले त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस सर्वाधिक आक्रमक राहिले. ते पूर्वी राष्ट्रवादीतले नेते असल्याने त्यांना त्या पक्षातली सगळी अंडी पिल्ली माहिती होती. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या मोर्चांमध्ये ती बाहेर काढली. त्यांनी परभणीतल्या मोर्चात अजितदादा क्या हुआ तेरा वादा??, असा सवाल करत संतोष देशमुख प्रकरण थेट अजितदादांना भिडवले.
श्री @Dev_Fadnavis जी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2025
श्री @Dev_Fadnavis जी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2025
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ.सुरेश अण्णा धस जाणीव पूर्वक राजकारण करत आहेत.परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा …म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णा ला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का ? निष्पक्ष चौकशी… — Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) January 5, 2025
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ.सुरेश अण्णा धस जाणीव पूर्वक राजकारण करत आहेत.परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा …म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णा ला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का ? निष्पक्ष चौकशी…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) January 5, 2025
संतोष देशमुख प्रकरणावरून राज्यभर घमासान सुरू असताना कुठलीही कारवाई न करता अजितदादा नामानिराळे राहिले होते. त्यांनी एकही शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्या उलट देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या कसोटी पूर्ण करत सर्व प्रकारच्या कारवाया केल्या. पण भाजपचे आमदार आता आपल्याला घेरत चाललेत हे लक्षात येताच अजितदादांनी आपले प्रवक्ते कामाला लावले. आमदार अमोल मिटकरी आणि सुरज चव्हाण यांनी ट्विट करून सुरेश धस यांच्यावर शरसंधान साधले त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धस यांना आवरण्याचे आवाहन केले. सुरेश धसांना अमोल मिटकरी बैल म्हणाले, तर सुरज चव्हाण यांनी गृह खात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सगळ्या प्रकरणात अजितदादा अजून नामानिराळे राहिले.
मात्र, भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याने अजून उत्तर दिलेले नाही. गृह खात्याची कायद्याच्या कसोटीवरची कारवाई सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App