Nilesh Lanka : सांगलीत ‘संस्कृती रक्षण मोर्चा’ : निलेश लंके, रोहित पवार यांचा गोपीचंद पडळकर आणि भाजपवर हल्लाबोल

Nilesh Lanka

विशेष प्रतिनिधी

 

सांगली : Nilesh Lanka : सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आयोजित केलेल्या ‘संस्कृती रक्षण मोर्चा’ सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादाची तीव्र पडसाद उमटले. या सभेत खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर सडेतोड टीका केली.

रणांगणात येण्याचे निलेश लंकेंचे आव्हान
खासदार निलेश लंके म्हणाले, “यांचा मालक वातानुकूलित खोलीत बसतो, त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. एकदा पोलिसांना बाजूला करा, खरी हिम्मत असेल तर रणांगणात उतरा. सरकारमधील नेत्यांकडे विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही, म्हणूनच अशी खालच्या पातळीची वक्तव्ये केली जातात. हे वाचाळवीर आधी दोन पोलिसांसह फिरायचे, आता चार पोलिस घेऊन फिरतात. खरे सामर्थ्य असेल तर पोलिसांशिवाय बाहेर पडा आणि स्पष्ट लढाई लढा,” असे खणखणीत आव्हान त्यांनी पडळकरांना दिले.



गोपीचंद पडळकर म्हणजे बनावट सोने : रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनीही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “गोपीचंद पडळकर हे बनावट सोन्यासारखे आहेत. हा मुद्दा फक्त तालुका किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्या सांस्कृतिक वारशाशी निगडीत आहे. आम्हीही खालच्या थराला जाऊन बोलू शकतो, पण आम्ही शब्दांची मर्यादा पाळतो. काही नेते स्वतःला चाणक्य समजतात. याच नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जाहिराती आणि निनावी पत्रके प्रसिद्ध केली. महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

यांचा खरा सूत्रधार कोण? रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील थोर समाजसुधारकांनी आम्हाला आदर्श विचार दिले. आपण त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, पण त्यांचे विचार अंगीकारत नाही. बहुजन समाजाच्या नेत्यांचा वापर पवार कुटुंब आणि अन्य प्रमुख नेत्यांविरोधात बोलण्यासाठी केला जात आहे. पवार किंवा पाटील कुटुंबावर टीका करताना या नेत्यांना हे कळत नाही की त्यांचा गैरवापर होत आहे. या प्याद्यांवर बोलण्यात अर्थ नाही, त्यांचा खरा सूत्रधार कोण आहे, त्याच्यावर हल्ला करायला हवा. आमच्यावर ईडी किंवा कोणतीही कारवाई करा, आम्ही घाबरणार नाही. निवडणुका जवळ आल्या की हे लोक समाजात फूट पाडण्याचे काम करतात. लोकसभेत हिंदू-मुस्लिम, विधानसभेत मराठा-ओबीसी आणि आता मुंबईत मराठी-गैरमराठी असा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

‘Sanskrit Rakshan Morcha’ in Sangli: Nilesh Lanka, Rohit Pawar attack Gopichand Padalkar and BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात