विशेष प्रतिनिधी
नागपूर : Sanjay Shirsat शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्ध्याहून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. हे आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येण्याचा मानस व्यक्त केला आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्याकडे या आमदारांची नावे असल्याचाही व प्रसंगी ते जाहीर करण्याचाही इ्शारा दिला.Sanjay Shirsat
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आमदार विरोधी पक्षनेते होणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले. पत्रकारांनी याविषयी आदित्य यांना छेडले असता त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिंदे गटाचेच 20 आमदार कुठेतरी (भाजप) जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटाच्या आमदारांचा एक मोठा गट भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना वरील दावा केला आहेSanjay Shirsat
काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट?
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 13 आमदार माझ्या संपर्कात आहेत. या सर्व आमदारांची नावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर मी ती सांगेन. या आमदारांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीला वैतातगून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याचा मानस व्यक्त केला आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शिरसाट यांच्या या दाव्यामुळे आपले आमदार एकसंध ठेवण्याच्या प्रयत्नांत असलेल्या उद्धव यांच्या प्रयत्नांना झटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे.
शिंदेसेना आमचा मित्रपक्ष, त्यांचे आमदारही आमचेच – फडणवीस
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचा आदित्य ठाकरे यांचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही. उद्या कुणी असेही म्हणेल की, आदित्य ठाकरेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागलेत. असे उगीच काहीतरी म्हटल्याने काहीही होत नाही. आम्हाला शिंदेसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? ते आमचेच आहेत. शिंदेसेना आमचा मित्रपक्ष आहे. ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे मित्रपक्षांना पक्षात घेण्याचे कारण नाही. आम्ही तसे राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत. निश्चितपणे भविष्यात आमची महायुती अजून मजबूत होताना दिसेल, असे ते म्हणालेत.
आत्ता पाहू काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
पत्रकारांनी आज आदित्य ठाकरे यांना त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू असल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आदित्य यांनी ही पेरलेली बातमी असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्या तरी गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. पण मीच 22 आमदार कोणत्या तरी गटातून दुसरीकडे जात आहेत हे ऐकले आहे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App