प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांचा महाविकास आघाडीत मिठाचा खडा; म्हणाले, 19 खासदारांचा आमचा ठरलाय आकडा, असे आज वरळीत ठाकरे गटाच्या शिबिरात घडले!! ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या शिबिरात भाषण करताना जोपर्यंत आमची इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीत राहू कारण राजकारणात काहीही घडू शकते, असा इशारा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला. Sanjay Raut’s stone of salt in Mahavikas Aghadi has become our number of 19 MPs
जोपर्यंत आपली इच्छा असेल, तोपर्यंत आपण महाविकास आघाडीत राहू, राजकारणात काहीही होऊ शकते. कारण शिवसेनेचे आम्ही 19 खासदार निवडून आणणार आहोत असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबईवर कब्जा करण्यासाठी दिल्लीहून येतात. मात्र, मुंबई मराठी माणसाची असल्याचे त्यांनी ठकावून सांगितले. मुंबईला महापौर नसेल तर शोभा नाही. मुंबई, नागपूर आदी शहरांना महापौर नाही, महापौर म्हणजे कपाळावरील कुंकू आहे, तुम्ही आमचे कुंकू पुसले, असा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी केला.
सरकारला फाशीची शिक्षा
सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फाशीची शिक्षा दिली आहे. मात्र, फाशी देण्यासाठी आता त्यांना जल्लादाकडे प्रकरण पाठवले आहे. आता सरकारची बॉडी विधान सभेमध्ये आलेली आहे. लवकरच आपण त्यांना श्रद्धांजली वाहणार असून नवीन सरकार स्थापन करणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
स्वबळावर विधानसभेवर भगवा
आम्ही स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकवणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. आम्ही स्वभावावर सत्ता आणणार आहोत. हा आमचा पक्ष आहे आणि आमची तशी इच्छा आहे. ही अतिरेकी इच्छा नाही. ज्याचे घर फोडले, ज्यांचे जळते त्यांनाच कळते. आम्ही बोलतो, कारण आमचे जळाले आहे, असेही ते म्हणाले.
छळाची व्याजासह परतफेड
ज्यांनी – ज्यांनी आमचा छळ केला, त्याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा माझा शब्द आहे. इडी आणि सीबीआयची भीती आम्हाला दाखवू नका. आम्ही त्या अग्नीच्या भट्टीतून तापून बाहेर पडलो आहोत. त्यातूनच आमची शिवसेना निर्माण झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले.
आमचा आकडा ठरलाय
राज्यात आम्ही 19 खासदार निवडून आणणार आहोत. आमचा आकडा ठरलाय, आमचा आकडा बदलणार नाही. याआधी देखील निवडून आणले होते. एवढेच खासदार निवडून आले होते, तेवढेच खासदार पुन्हा निवडून अणणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामुळेच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाला जर 19 लोकसभा मतदारसंघ दिले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला किती येतील?, हा खरा प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App