वृत्तसंस्था
मुंबई : 100 दिवसानंतर शिवसेनेचा वाघ बाहेर येणार… वाघ बाहेर आला… तो डरकाळी फोडणार… शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार, असे ज्यांचे वर्णन मराठी माध्यमांनी केले होते, ते संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचा सूर आता बराच नरमला आहे. तो खाली आला आहे. आपण कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही. ईडी, सीबीआय तपास संस्थांवर देखील काही बोलणार नाही. आपली कोणाविषयी तक्रार नाही. आपण उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना देखील भेटणार आहोत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी करून आपला पालटलेला सूर मराठी माध्यमांना दाखवून दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळापेक्षा मराठी माध्यमांमध्ये आश्चर्याची खळबळ माजली आहे. Sanjay Raut’s low tone; No complaint against ED
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर रवाना होण्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांना बाईट दिला. या बाईटमध्ये त्यांनी आपला नरमलेला सूर दाखवून दिला. यात ते म्हणाले, ईडी किंवा सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणावर आपण काही भाष्य करणार नाही. आपण कोणतीही टीका टिप्पणी करणार नाही. इतकेच नाही, तर शिंदे फडणवीस सरकार आता आले आहे. त्यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचे स्वागतच करावे लागेल. जनतेच्या कामांसाठी मी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे. त्यानंतर दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेणार आहे. आज उद्धव ठाकरे यांना भेटून त्यानंतर शरद पवारांना भेटायला जाणार आहे.
Sanjay Raut : राज ठाकरे पुन्हा म्हणाले, “लवंडे”; फडणवीस म्हणाले, “बिनकामाचे”!!
फडणवीस यांच्या नेतृत्वाची स्तुती
राज्याचे नेतृत्व खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसच करत आहेत. त्यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचे कौतुक केलेच पाहिजे. यासाठीच मी त्यांची भेट घेणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हणतात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
100 दिवसाच्या कारावासाची सावरकरांची तुलना
संजय राऊत 100 दिवसच आर्थर रोड करावासात राहिले पण त्यांनी स्वतःची तुलना मात्र सावरकरांशी केली. सावरकर जसे अंदमानच्या काळकोठडीत एकलकोंडीत राहिले होते, तसेच आपण अर्थ रोड कारागृहात एकांतवासात राहिलो, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App