450 जागांवर भाजप विरुद्ध विरोधकांचा एकास एक उमेदवार; संजय राऊतांचा फॉर्म्युला काँग्रेसच्या मूळावर!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिहारची राजधानी पाटण्यात 15 पक्षांचे नेते एकत्र बैठकीला आले. पण तिथे प्रत्यक्षात ना नेता ठरला, ना आघाडीचा संयोजक तरी देखील भाजप विरोधात लढण्याचा निर्धार करताना सर्व विरोधकांचा मिळून एकास एक उमेदवार देण्याचा धोषा काँग्रेस सोडून बाकीच्या सर्व पक्षांनी लावला. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तर त्या संदर्भातला फॉर्म्युला जाहीर केला. पण आता हाच फॉर्म्युला काँग्रेसच्या मूळावर आला आहे. असे त्याच्या आकड्यावरून दिसते.Sanjay Raut’s formula at the core of Congress

भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष मिळून तब्बल 450 जागांवर एकाच एक उमेदवार देतील. त्यामुळे भाजपचा पराभव अटळ आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. तो दावा करताना त्यांनी अमित शाह यांच्या एका वक्तव्याकडे लक्ष वेधले. पाटण्यात आम्ही नुसता एकत्र फोटो काढला, तर भाजपने आपल्या 100 जागा कमी केल्या. आधी ते म्हणायचे अब की बार 400 पार. पण आता तेच म्हणतात, भाजप 300 जागा जिंकेल. पण विरोधक मात्र तब्बल 450 जागांवर एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील, असे संजय राऊत म्हणाले.



संजय राऊत यांचा हाच फॉर्म्युला काँग्रेसच्या मूळावर आला आहे. निदान आकडेवारी तरी तशीच सांगते. कारण काँग्रेसने आत्तापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीत 400 पेक्षा कधीच कमी जागा लढवलेल्या नाहीत. काँग्रेसने आत्तापर्यंत लढवलेल्या जागांमध्ये कमीत कमी जागा म्हणजे 421 जागा त्यांनी 2019 च्या निवडणुकीतल्या लढविल्या. पण संजय राऊत यांचा फॉर्मुला मान्य करून जर सर्व विरोधकांना 450 जागांवर एकास एक असा उमेदवार द्यायचा असेल, तर काँग्रेसलाच सर्वाधिक “त्याग” करावा लागेल, असे दिसते. कारण पाटण्यात उपस्थित राहिलेल्या 15 पक्षांपैकी प्रत्येक पक्षाने किमान 10 जागा लढवायच्या म्हटल्या तरी त्या 150 जागा होतात आणि 542 पैकी 150 जागा बाकीच्या विरोधकांना द्यायचे म्हटल्यावर काँग्रेसची जागा लढवण्याची टॅली आपोआपच 400 च्या खाली येते. ती 390 च्या घरात जाते. याचा अर्थ भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याचे सर्व प्रादेशिक पक्षांचे समाधान जरूर होते, पण विरोधकांचे हे ऐक्य संख्यात्मक पातळीवर काँग्रेसच्याच मूळावर येते!!

याचा अर्थ राष्ट्रीय राजकारणातला काँग्रेसचा सिंहाचा वाटा भाजप नव्हे, तर काँग्रेसच्याच सोबतीला असणारे प्रादेशिक पक्षच खेचून घेतात, असा होतो आहे. अर्थात हा संजय राऊत यांचा फॉर्म्युला आहे. तो काँग्रेसला मान्य होईलच असे नाही. संजय राऊत यांची कुठलीही वक्तव्ये काँग्रेसचे नेते प्रदेश पातळीवरच खोडून काढतात, तर संजय राऊत यांचा लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला काँग्रेसचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी कसे काय मंजूर करतील??, हा सर्वात कळीचा प्रश्न आहे.

Sanjay Raut’s formula at the core of Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात