Nitesh Rane : तुरुंगात असताना संजय राऊत उद्धव ठाकरेंना शिव्या द्यायचे, नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप

Nitesh Rane

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitesh Rane शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कारागृहात असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचा गंभीर आरोप मत्स्य व बंदर विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. “तुरुंगात राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना शिव्या दिल्या, त्यांची लायकी काढली आणि हे सगळं इतर कैद्यांच्या समोर बोलले,” असा दावा राणे यांनी केला. याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Nitesh Rane

संजय राऊत यांनी लिहिलेलं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक शनिवारी प्रकाशित होणार असून, यामध्ये अनेक राजकीय दावे असल्याने “महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होईल,” असे राऊत यांनी म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “पुस्तकात काही पाने लिहायची राहिली असावीत, कारण तुरुंगात उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर जे अपमानास्पद शब्द वापरले गेले, त्याचा उल्लेख राऊत यांनी मुद्दाम टाळला आहे.”



राणे यांनी पुढे म्हटले, “राऊत तुरुंगात असताना ज्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्याविषयी शिवीगाळ केली, त्या सगळ्यांचा पुरावा आमच्याकडे आहे. त्यामुळे हे अर्धवट पुस्तक न काढता संपूर्ण सत्य मांडावं. तुम्ही ज्या उद्धव ठाकरे यांचं प्रेम सध्या दाखवत आहात, ते खोटं आणि दिखाऊ आहे.”

राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल करत पुढे म्हटले, “ज्यांच्यावर तुम्ही तुरुंगात असताना शिव्या घातल्या, आज त्यांच्यासाठीच पुस्तकात प्रेम दाखवताय? मग का त्याचा उल्लेख पुस्तकात नाही? अर्धवट लिहू नका. पूर्ण सत्य लिहा. मग त्यानंतर ‘नरकात पोहोचवण्याचं’ काम उद्धव ठाकरेंच करतील!”

Sanjay Raut used to abuse Uddhav Thackeray while in jail, Nitesh Rane’s sensational allegation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात