मुका घ्या मुका वगैरे ठीक आहे, पण संजय राऊत शिवसैनिकांना “शिवसेना कार्यकर्ते” का म्हणालेत??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ प्रकरणात पोलिसांची कायदेशीर कारवाई सुरू असताना संजय राऊत यांनी आज नियमित पत्रकार परिषदेत एक चटकदार व्यक्तव्य करून त्याला ट्विस्ट दिला आहे. मुका घ्या मुका हा सिनेमा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला काय मुके घ्यायचे ते घ्या, मिठ्या मारा पण शिवसेना कार्यकर्त्यांना का अडकवता त्यात?? आमच्या शिवसेना कार्यकर्त्यांचा त्यात संबंध काय?? मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही. पण आमच्या असंख्य कार्यकर्त्यांचा घरातून फोन आले की त्यांना अडकवले जात आहे पोलीस त्यांच्या घरात जाऊन दम देत आहेत. ही सरकारची मोगलाई नाही का??, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut targets shinde faction over Sheetal mhatre morphed video and remarks sarcastically about the incident at the same time he call Shivsena workers and shivsainiks

राऊतांचे हे वक्तव्य मुका घ्या मुका आणि दादा कोंडके यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. दादा कोंडके आज हयात असते तर त्यांनी त्यांच्या मुका घ्या मुका जुन्या सिनेमा सारखा हा नवीन मुका घ्या मुका सिनेमा काढला असता, असा टोला त्यांनी शिंदे गटाला हाणला आहे.

राऊतांची पत्रकार परिषद नेहमीप्रमाणे मराठी माध्यमांनी व्हायरल करून ती गाजवलीच आहे. त्यात मुका घ्या मुका हे चटकदार शब्द वापरून त्यात दादा कोंडकेंचे नाव घेऊन संजय राऊत यांनी महाराष्ट्राला हसवण्याचा प्रयत्न केला आहे.



पण इथे मुद्दा वेगळाच आहे. संजय राऊत एरवी जो जहाल – कट्टर शब्द नेहमी वापरत असतात, तो त्यांनी या वेळेला का वापरला नाही??, हा प्रश्न आहे. संजय राऊत यांच्या तोंडी “शिवसेना कार्यकर्ते” हे शब्द आले आहेत. ते एकदा नव्हे तर दोन-तीनदा आले आहेत आणि एखाद दुसऱ्या वेळेला “शिवसैनिक” शब्द आला आहे. शिवसेनेचे “शिवसैनिक” हे “कार्यकर्ते” कधीपासून झाले?? कारण “कार्यकर्ते” हे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या पक्षांचे असतात. बाळासाहेबांचे असतात, ते “शिवसैनिक” असतात. हे वर्षानुवर्षाचे समीकरण आहे. ते एका दुसऱ्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता सगळ्यांना मान्य आहे. शिवसेना कार्यकर्त्यांचा उल्लेख नेहमीच “शिवसैनिक” असाच केला जातो. मग दस्तूर खुद्द सामनाचे कार्यकारी संपादक तो “शिवसैनिक” विसरले का?? आणि म्हणून त्यांनी थेट आजच्या पत्रकार परिषदेत “शिवसेना कार्यकर्ते” असा उल्लेख केला का?? की आता आपल्या शिवसेनेत “ते शिवसैनिक” उरले नाहीत. जे उरले आहेत, ते “शिवसेनेचे कार्यकर्ते” आहेत, असे संजय राऊत यांना वाटत आहे?? की त्यांची तशी खात्रीच पटली आहे??

तसे असेल तर उद्धव ठाकरे गटातला हा फार मोठा राजकीय बदल आहे आणि तो संजय राऊत यांनी फार सूचक पद्धतीने सांगितला आहे. मग भले त्यांचे मुका घ्या मुका हे वक्तव्य गाजत असेल, पण त्या वक्तव्यात दडलेले “शिवसेना कार्यकर्ते” हे शब्द मात्र त्यापेक्षा महत्त्वाचे आहेत… शिवसेनेच्या ठाकरे गटातला हा मोठा “पॉलिटिकल शिफ्ट” आहे का?

Sanjay Raut targets shinde faction over Sheetal mhatre morphed video and remarks sarcastically about the incident at the same time he call Shivsena workers and shivsainiks

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात