विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut अजितदादांची पुन्हा उफाळली मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा; संजय राऊतांनी फेरले त्यांच्या आमदारकीवर पाणी!! Sanjay Raut target to ajit pawar
त्याचे झाले असे :
इंडिया टुडेच्या कॉन्क्लेवमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या अजित पवारांना राजदीप सरदेसाई यांनी मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला. अजित पवार पाच वेळा उपमुख्यमंत्री झाले, पण ते मुख्यमंत्री कधी होणार??, मुख्यमंत्री व्हायची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे ना??, असा सवाल सरदेसाई यांनी केला त्यावर अजितदादांनी नेहमीचे उत्तर दिले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी आली होती. कारण त्यावेळी आमदार संख्या काँग्रेस पेक्षा जास्त होती. परंतु वरिष्ठांनी त्यावेळी तो निर्णय घेतला नाही. आता देखील जो 145 आकडा गाठेल, तो मुख्यमंत्री होईल. ज्यावेळेस आम्हाला ती संधी येईल त्यावेळी ती घेऊ, असे अजितदादा म्हणाले. Sanjay Raut
Narendra Modi : ‘हरियाणाचे हे प्रेम माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे’
अजितदादांच्या मुलाखतीमुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेविषयी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली. त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा इथून पुढे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री व्हायचे तर सोडाच, ते आमदार देखील होतील की नाही याविषयी शंका आहे, अशा शब्दांत राऊत यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेवर पाणी फेरले. Sanjay Raut
अजित पवार हे महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांना नकोसे झाले आहेत. त्यांना कमीत कमी जागा देऊन महायुतीतून बाहेर काढण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची झाली तर एकट्याच्याच बळावर लढवावी लागेल. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत पूर्ण संपून जाईल. अजितदादा आमदार देखील होणे अवघड आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला Sanjay Raut
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App