विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Nirupam शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून बोलताना अनेकवेळा नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल, असे विधान केले होते. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील असे विधान केले आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे.Sanjay Nirupam
संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात पत्र दिले आहे. संजय निरुपम यांनी त्यांच्या पत्रात म्हटले की, उबाठा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर नेपाळमधील हिंसाचार भारतात देखील होऊ शकतो, अशा प्रकारची पोस्ट केली आहे. यापूर्वीही संजय राऊत यांनी श्रीलंका आणि बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटना भारताशी जोडून देशविरोधी वक्तव्य केली होती. आता नेपाळमधील हिंसाचारानंतर ते पुन्हा भारता विरोधात गरळ ओकत असून त्यांची भाषा म्हणजे देशद्रोह आहे.Sanjay Nirupam
भारतातही हिंसा भडकवण्याचा प्रयत्न
तसेच संजय राऊत भारतात जनभावना भडकवण्याचे काम करत असून नेपाळमधील हिंसाचारावरून भारतातही हिंसा भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नेपाळ हिंसाचाराची तुलना करुन भारतविरोधी वक्तव्य करण्याचा कुटील डाव राऊत यांच्याकडून खेळला जात आहे. श्री. राऊत यांची भूमिका संविधान आणि लोकशाही विरोधी असल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले.
याकरिता माझी आपणांस विनंती आहे कि, वारंवार देशविरोधी भाषा बोलणारे उबाठा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आपल्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती संजय निरुपम यांनी पोलिसांना केली आहे.
हिंसा भडकावून संविधान वाचवणार आहात का?
पत्रकारांशी बोलताना संजय निरुपम म्हणाले, नेपाळ हिंसाचारानंतर संजय राऊत यांनी वारंवार केलेले विधान असे दर्शवते की त्यांना भारतात देखील अशा प्रकारची हिंसा घडवायची आहे. संजय राऊत यांच्यासह या सगळ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांना जे हातात संविधान घेऊन फिरतात आणि संविधान वाचवण्याच्या गोष्टी करतात त्यांना माझा सवाल आहे, हिंसा भडकावून संविधान वाचवणार आहात का? जे कोणी असे हिंसक विधान करत असतील त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे.
जनतेच्या भावना भडकावण्याचे अधिकार नाही
पुढे बोलताना संजय निरुपम म्हणाले, संजय राऊत यांचे सगळे विधान पाहता, त्याचा तपास करून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी घेऊन मी पोलिस ठाण्यात आलो आहे. विरोधकांचे ते कामच आहे की सरकारवर टीका करणे, परंतु जनतेच्या भावना भडकावण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाही. देशात हिंसा भडकावण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाही. जे काही ते करत आहेत ते देशाच्या संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App