शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.Sanjay Raut met Rahul Gandhi on Lakhimpur issue and said- is there any democracy left in the country?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सध्या लखीमपूर हिंसाचार प्रकरण चांगलच तापल आहे. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट करून आपापला संताप व्यक्त केला आहे. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली.या भेटीत जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी संजय राज्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का?
चर्चेमध्ये संजय राऊत म्हणाले की , राहुल गांधी यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक गोष्टी मी सांगू शकत नाही. काही गोष्टी आमच्या दोघांमध्ये राहू द्या. पुढे संजय राऊत यांनी पत्रकारांना प्रश्न विचारलाय. संजय राऊत पत्रकारांना म्हणाले की , लखीमपूरला विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ जाणार का?
देशात लोकशाही उरली आहे का? देशात जे काही सुरु आहे त्यावर आम्ही चर्चा केली. लोकशाही व्यवस्था पूर्णपणे ध्वस्त झाली आहे. राहुल गांधींसोबत राजकीय चर्चा झाली. आता विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मतही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलंय.
संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली की , लखीमपूर हिंसाचारामुळे देश हादरला आहे. प्रियंका गांधी यांना यूपी सरकारनं अटक केलीय. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यास रोखल जातय. प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे. राहुल गांधी यांना दुपारी सव्वा चार वाजता भेटणार आहे, अशी माहिती होती.
#LakhimpurKheriViolence has shaken the nation,@priyankagandhi has been arrested UP govt, opposition leaders are being restricted from meeting farmers. There is need for joint opposition action against oppression by Government in UP. Meeting @RahulGandhi at 4.15 pm todayजय हिंद! — Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2021
#LakhimpurKheriViolence has shaken the nation,@priyankagandhi has been arrested UP govt, opposition leaders are being restricted from meeting farmers. There is need for joint opposition action against oppression by Government in UP. Meeting @RahulGandhi at 4.15 pm todayजय हिंद!
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App