प्रतिनिधी
मुंबई : विविध विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटने या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. पण शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत येण्याची गरज नाही, संजय राऊत पुरेसे आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाणला आहे. Sanjay Raut is enough to end Shiv Sena, no need for Modi to come to Mumbai; A group of Bawankules
शिवसेना संपवण्यासाठी मोदींना मुंबईत येण्याची गरज नाही. आम्ही छोटे कार्यकर्तेच पुरेसे आहोत. त्यांच्याकडे उरलेले आमदार, खासदारच पुढील काळात आमच्याकडे येतील. संजय राऊतांमुळे अनेक जण आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील. संजय राऊतच शिवसेना संपवण्यासाठी पुरेसे आहेत. उद्धव ठाकरेंना पक्षाचे आमदार स्वत:ला सांभाळायला येत नाही ते मित्रपक्षांना कसे सांभाळतील? पक्षाचे लोक तुम्हाला सोडून जातात दुसरे तुमच्याकडे का येतील?, असा खोचक सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.
उद्धव ठाकरे केवळ निवडणुकीपुरते जवळ येतील आणि नंतर दूर जातील हे प्रकाश आंबेडकरांनाही माहिती आहे. ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. स्वार्थासाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस राष्ट्रवादी हे तिघे एकत्र आले आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App