विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अखेर काल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केल्याची बातमी आहे. स्वतः संजय राऊत यांनी या संदर्भात एक ट्विट करून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर सब कुछ ठीक है, चिंता की कोई बात नही, असे आश्वस्त करणारे ट्विट देखील राऊत यांनी केले आहे.Sanjay Raut discusses important issues with Sonia – Rahul Gandhi; But it had a Savarkar subject??; Read Raut’s tweet
संसदेतून संजय राऊत घरी पोहोचले आणि राहुल गांधींचा फोन आला, त्यामुळे राऊत यांनी पुन्हा संसदेत जाऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली. संसदेतून घरी पोहोचलेले संजय राऊत हे राहुल गांधींच्या भेटीसाठी संसदेत कसे परत आले, याच्या बातम्या मराठी माध्यमांनी केल्या आहेत.
मात्र, संजय राऊत यांचे ट्विट आणि मराठी माध्यमांमधल्या बातम्या यामधून मूळातल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर चर्चा झाली की नाही यावर कोणताही खुलासा होत नाही.
श्रीमती सोनिया गांधी और श्री राहुल गांधी जी से आज मुलाकात हुई. कई अहम मुद्दों पर विस्तार से चर्चा भी हुई. सभी कुछ ठीक है. चिंता की कोई बात नहीं है. — Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
श्रीमती सोनिया गांधी और श्री राहुल गांधी जी से आज मुलाकात हुई. कई अहम मुद्दों पर विस्तार से चर्चा भी हुई. सभी कुछ ठीक है. चिंता की कोई बात नहीं है.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
संजय राऊत यांनी आत्तापर्यंत अनेकदा राहुल गांधींनी सावरकरांचा विषय टाळायला हवा होता. शिवसेनेच्या भावना आणि महाराष्ट्राच्या भावना त्यामुळे दुखावल्या आहेत, असे म्हटले होते. त्याच्या बातम्याही मराठी प्रसार माध्यमांसह सर्व प्रसार माध्यमांनी दाखवल्या होत्या. पण राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रत्यक्ष भेटीची माहिती देणारे जे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे,
श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी. — Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2023
श्रीमती सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांची आज भेट झाली.अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी.
त्यामध्ये सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्याचा उल्लेख नाही. संबंधित मराठी आणि हिंदी ट्विटमध्ये संजय राऊत यांनी सावरकर नावाचा उल्लेखही केलेला नाही, मात्र सर्व महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाल्याचा उल्लेख केला आहे. मग यात सावरकरांचा मुद्दा चर्चेत होता का?? संजय राऊत यांनी चर्चेत सावरकरांविषयी सांगितलेली माहिती अथवा केलेला युक्तिवाद सोनिया आणि राहुल गांधी यांना पटला का??, याविषयीचा खुलासा होत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचे ट्विट जरी संजय राऊत यांनी केले असले तरी प्रत्यक्ष ज्या मुद्द्यावरून वाद झाला, तो सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रबिंदूवर होता की बाकी अनुषंगिक गोष्टींवर चर्चा झाली??, याचा खुलासा मराठी माध्यमातून आणि संजय राऊत यांच्या ट्विटमधून होत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App