नाशिक : Waqf सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे उरलेले लळिताचे राजकीय कीर्तन अजून सुरू असून संसदेतल्या वादसंवाद असे पडसाद अजूनही राजकीय वर्तुळात उमटत आहेत. मुस्लिम संघटनांच्या आंदोलनाचा भाग अलहिदा, पण संसदेत एकमेकांवर उभे ठाकलेले खासदारच बाहेर येऊन सुद्धा एकमेकांची खेचत आहेत. यात शिवसेनेचे संजय राऊत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आघाडीवर दिसत आहेत. पण या सगळ्यात सत्तारूढ भाजपच्या हिंदुत्वाचा असा काही झटका बसलाय, की त्यामुळे पवार संस्कारित प्रफुल्ल पटेल यांना संजय राऊत यांच्या शिव्यांचा फटका बसतोय.
– पवार काका – पुतण्यांना दिल्लीत किंमत नाही
सत्तारूढ भाजपच्या हिंदुत्वाच्या झटक्याने जे भलेभले “सरळ” झाले, त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी देखील सामील आहे. सत्तारूढ भाजपच्या झटक्यामुळेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुकाटपणे waqf सुधारणा विधेयकाच्या बाजूने भूमिका घ्यावी लागली. अर्थात ही भूमिका काही त्यांनी सुखासुखी घेतली नाही. भाजपच्या सत्तेच्या वळचळणीला येऊन बसल्यामुळे तशी भूमिका त्यांना घ्यावी लागली. त्यांना दुसरा पर्यायच असा नव्हता. कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारखी पवार काका – पुतण्यांकडे दिल्लीत political nuisance value नाही. त्यांची फक्त मराठी माध्यमांमध्येच चबढब चालते. दिल्लीत त्यांना काही किंमत नाही. त्यामुळे waqf सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाकदुऱ्या काढायचा प्रश्नच उद्भवला नाही. जिथे मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या political heavyweights च्या नाकदुऱ्या काढल्या नाहीत, तिथे भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाकदुऱ्या काढणे संभवतच नव्हते.
– अजितदादांच्या राष्ट्रवादीला पर्यायच नव्हता
उलट अजित पवारांनी कुठल्यातरी राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाता मारत जर waqf सुधारणा विधेयकाच्या विरोधात संसदेत भूमिका घेतली असती आणि त्याच्या विरोधात मतदान केले असते, तर भाजपच्या वळचणीला आल्यामुळे मिळालेली सत्ता गमावण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नसता. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी मुकाट्याने राज्यसभेत भाषण करताना मोदी सरकारने आणलेल्या Waqf सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला. पण तो पाठिंबा देताना त्यांनी संजय राऊत यांना डिवचले. बाबरी मशीद पाडली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते??, मुंबईच्या दंग्याच्या वेळी काय म्हणाले होते??, याची आठवण प्रफुल्ल पटेलांनी संजय राऊतांना राज्यसभेच्या पटलावर करून दिली. त्यामुळे संजय राऊत चिडले आणि ते त्यांना रोज शिव्या घालू लागलेत. प्रफुल्ल पटेलांचा सगळा जुना राजकीय इतिहास त्यांनी बाहेर काढला. प्रफुल्ल पटेल व्यापारी आहेत, पण ते गांडू आहेत. त्यांच्यात भाजपच्या विरोधात लढायचा दम नाही. इक्बाल मिर्चीशी त्यांनी व्यवहार केले. शरद पवारांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसून ते निघून गेले. आता ते भाजपची धुणी भांडी करतायेत. भाजपच्या नेत्यांचे बूट चपला पॉलिश करतायेत, अशा एकाचढ एक दुगाण्या संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर झोडून घेतल्या.
– सेक्युलर पक्षांचे बुरखे फाटले
प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे सहजासहजी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेले नाहीत. त्यांना भाजपने परवानगी दिली म्हणून ते सत्तेच्या वळचणीला येऊन बसू शकले, याची संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांना वारंवार शिव्या घालत जाणीव करून दिली. पण या सगळ्यांमध्ये भाजपने मात्र उत्तम राजकारण साधून घेतले. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन सत्तेची ऊब घेणाऱ्या सगळ्या सेक्युलर पक्षांच्या तोंडावरचे बुरखे फाडले. सत्तेच्या तुकड्यासाठी वखवखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांचे सेक्युलर बुरखे किती खोटे आणि कुचकमी आहेत हे सगळ्या जगासमोर उघड्यावर आणले. शरद पवारांना सुद्धा waqf सुधारणा विधेयकाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणे भाग पाडले. मोदी + शरद पवार राजकीय गुळपीठ कामी आले. मोदींच्या भाजपने पवारांच्या राष्ट्रवादीचा राजकीय वापर करून घेतला. संजय राऊत यांच्या शिव्यांमधून ते सगळ्या जगासमोर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App