मतदारांबाबत बोलताना संजय गायकवाड म्हणाले- 2-2 हजारांत विकले गेले, तुम्हाला फक्त दारू-मटण पाहिजे, तुमच्यापेक्षा वेश्या बऱ्या

Sanjay Gaikwad

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा : Sanjay Gaikwad बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी मतदारांवर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मतदारांना फक्त दारू, मटण पाहिजे, मतदार विकले गेले आहेत, असा आरोपी संजय गायकवाड यांनी केला. तसेच मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या, असे आक्षेपार्ह शब्द वापरले. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आमदार संजय गायकवाड यांचा विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून निसटता विजय झाला. कमी फरकाने झालेला विजय त्यांच्या जिव्हारी लागल्याचे अनेकवेळा दिसून आले. दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यातील जयपूरमध्ये संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मतदान कमी मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली. तसेच जाहीर भाषणात मतदारांसंदर्भात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले. याचदरम्यान संजय गायकवाड यांनी उपरोक्त वक्तव्य केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?

आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्यांची लाखोली वाहिल्याचे व्हिडिओ दिसते. तुम्ही मला एक मत देऊ शकत नाही. तुम्हाला फक्त दारू, मटण पाहिजे. मी कोट्यवधीची कामे केली. तरीही लोकांनी मला मतदान केले नाही. मतदार दोन दोन हजारात विकले गेले. XXXX XX असे म्हणत यांच्यापेक्षा वेश्या बऱ्या, अशी मतदारांना शिवीगाळ केली. पुढे बोलताना, मी अब्जावधी रुपयांना लाथ मारली. शेवटी सत्याचा विजय झाला. माझ्या विरोधात सगळे विरोधक एक झाले. परंतु सगळे लटकले, असे ते म्हणाले.

गायकवाडांचा 841 मतांनी विजय

दरम्यान, संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी कडवे आव्हान दिले होते. जयश्री शेळके यांना 90 हजार 819 मते पडली होती. तर संजय गायकवाड यांना 91 हजार 660 मते पडली होती. संजय गायकवाड यांचा अवघ्या 841 मतांनी विजय झाला होता. या विजयानंतर देखील त्यांनी मतदारांवर राग काढला आहे.

Sanjay Gaikwad said – They were sold for 2,000 each

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात