विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Sanjana Jadhav भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कन्नड विधानसभेची जागा शिंदे गटाला सुटली आहे. या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला,तरी त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांना उमेदवारी मिळाल्यास कन्नडमध्ये ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत, अपक्ष हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. Sanjana Jadhav
जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास राज्यात प्रथमच पती विरुद्ध पत्नीअशी थेट लढत होईल. हर्षवर्धन जाधव यांचे वडील स्व. रायभानजाधव १९८० मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस यू. कडून, १९९० मध्ये अपक्ष, १९९५ मध्ये काँग्रेस आयकडून तर, त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी २००९मध्ये मनसे कडून व २०१४ मध्ये शिवसेनेकडून दोन वेळा प्रतिनिधित्व केले. संजना जाधव २०१४ मध्येजिल्हा परिषद सदस्या होत्या. संजना जाधव यांचे कला शाखेत पदवीपर्यंत शिक्षण झालेले आहे.२०१९ पासून हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव विभक्त आहेत.
माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या राजकीय वजनामुळे त्यांच्या कन्येला उमेदवारी मिळाल्यास, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोष उफाळून येण्याची शक्यता राजकी वर्तुळात व्यक्त होत आहे. सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App