SAMEER WANKHEDE: समीर वानखेडे प्रकरणाचा महाराष्ट्रभर प्रवास ! मुंबई ते औरंगाबाद व्हाया रिसोड ;आता औरंगाबादेत मलिकांविरूद्ध तक्रार

समीर वानखेडे हे मुळ विदर्भातील वाशिम जिल्ह्यातले.


त्यांचे वडिल मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास. आता समीर वानखेडे देखील मुंबईतच राहतात.


मात्र नवाब मलिक यांच्याविरुद्धची तक्रार थेट औरंगाबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : समीर वानखेडे हे मुस्लीम असून, त्यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. नवाब मलिकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांना देखील त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तशी तक्रार समीर वानखेडे यांच्या आत्याने केली असून, समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा मलिकांचा दावाही सपशेल खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नवाब मलिकांच्या आरोपांमुळे माझ्या सुनांचे कुटुंबीय फसवणूक केल्याचं म्हणताहेत असही त्यांनी तक्रारीत म्हण्टल आहे. SAMEER WANKHEDE: Sameer Wankhede case travels across Maharashtra! Mumbai to Aurangabad via Risod; now a complaint against Malik in Aurangabad

तसेच समीर वानखेडे यांची पूर्ण वंशावळ जातीच्या पुराव्यांसह त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केली आहे. समीर वानखेडे मुस्लीम असून, त्यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवली असल्याचा दावा मलिकांकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान, आता हे प्रकरण औरंगाबादपर्यंत जाऊन पोहोचलं आहे.



समीर वानखेडे यांची आत्या गुंफाबाई भालेराव यांनी आता नवाब मलिक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गुंफाबाई भालेराव यांनी मलिकांनी केलेला दावा फेटाळला आहे. त्याचबरोबर औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नवाब मलिक यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार कारवाई करण्याची मागणी गुंफाबाई भालेराव यांनी केली आहे.

गुंफाबाई भालेराव यांचं म्हणणं काय?

‘नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर रोजच नवनवे आरोप करत आहेत. त्यांना मुस्लीम असं संबोधत आहेत. त्या आरोपांचा त्रास आता आम्हाला होत आहे. समीर वानखेडे हा माझा सख्खा भाचा असून त्यांचे वडील माझे सख्खे मोठे बंधू आहेत’, असा दावा गुंफाबाई भालेराव यांनी केला आहे.

‘नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे माझ्या सुनांचे कुटुंबीय आमच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी तक्रार मुकुंदवाडी पोलिसांत आम्ही दिली आहे’, असं गुंफाबाई भालेराव यांनी सांगितलं.

‘समीर वानखेडे यांची पूर्ण वंशावळ जातीच्या पुराव्यांसह आम्ही पोलिसांकडे दिली आहे’, अशी माहितीही समीर वानखेडे यांचे आतेभाऊ प्रमोद भालेराव यांनी दिली आहे.

SAMEER WANKHEDE : Sameer Wankhede case travels across Maharashtra! Mumbai to Aurangabad via Risod; now a complaint against Malik in Aurangabad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात