विशेष प्रतिनिधी
बीड : Sambhajiraje Chhatrapati संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना भेट घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लगेच निर्णय होतो. याच्या मागे काही लपले आहे, हा संशोधनाचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की शरण आला म्हणजे गुन्हा संपत नाही. 14 गुन्हे असूनही बॉडी गार्ड घेऊन फिरतो. या सगळ्या आरोपींना मोक्का लावणार असे तुम्ही म्हणाला होता, त्यावर मोक्का लावणे महत्त्वाचे आहे.Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजे म्हणाले, खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केली आणि नंतर बेल घेऊन बाहेर पडणार हा खेळखंडोबा आम्ही सहन करणार नाहीत. तुम्ही मोका कसे लावणार, खुनाचा गुन्हा कसा लावणार यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये हे देखील मी म्हणालो आहे. तसेच त्यांना पालकमंत्री केले तर मला बीडचे पालकत्व घ्यावे लागेल असे मी म्हणालो आहे. त्यांना मंत्रीपदावरच घ्यायला नको आहे, त्याशिवाय न्याय मिळणार नाही.
संभाजीराजे पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांना संरक्षण का दिले जाते. बीडमध्ये कोणालाही जाऊन विचारले की वाल्मीक कराड कोण आहे, सगळे सांगतील हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात जणांचा म्होरक्या आहे. आणि या म्होरक्यावर कोणाचा आशीर्वाद आहे तर धनंजय मुंडेचा आहे. शरण आला म्हणजे संपले असे नाही, आता खरी जबाबदारी सरकारची वाढली आहे
. ते सीडीआर सगळे काढले पाहिजेत, पुण्यात असून यांना माहीत नाही. दोन नगरसेवक त्याच्या सोबत फिरत होते तरी कोणाला समजत नाही म्हणजे हे अपयश आहे.
वाल्मीक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे. इतर सात आरोपी सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या खुनशी जोडलेला आहे, असे देखील संभाजीराजे म्हणाले आहेत. खंडणीच्या नावाखाली शरण होणे इथेच हा विषय संपणार नाही. वाल्मीक कराड हा खुनातील आरोपींचा म्होरक्या आहे. 14 गुन्हे असून देखील त्याला संरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य तो कलम लागणे गरजेचे आहे.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, धनंजय मुंडे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांची बैठक झाली आणि बरोबर त्यानंतर हा वाल्मीक कराड शरण येतो. म्हणजे यात काही संबंध आहे का त्यांचा? धनंजय मुंडे यांनी काय चर्चा केली मुख्यमंत्ऱ्यानसोबत ते देखील आम्हाला समजले पाहिजे. धनंजय मुंडे यांनी चर्चा करून वाल्मीक कराडला सांगितले का की आता शरण हो. विशेष म्हणजे तो पुण्यातच होतो 3 दिवस. अक्कलकोटला स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन येतो. एवढे सगळे कनेक्शन असताना सीआयडीला पकडता आले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App