विशेष प्रतिनिधी
इचलकरंजी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री शंभुतीर्थ चौक, इचलकरंजी येथील स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. Sambhaji Maharaj
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांच्याबद्दल ‘देशधर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था’ असे म्हटले जाते, असे स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याची मला संधी मिळाली, याचा आनंद आहे.
हिंदवी साम्राज्याला समर्पित असा हा आजचा दिवस आहे, इचलकरंजी या शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे एक तेज पाहायला मिळते. त्यामुळे या शहराला भगवे शहर म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच CBSE च्या अभ्यासक्रमात आता आपल्या हिंदवी साम्राज्याचा इतिहास मोठ्या प्रमाणावर झळकत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. हा केवळ पुतळा नाही, तर आपला स्वाभिमान आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, संभाजी भिडे गुरुजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App