Samata Patsanstha : समता पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप; 40 कोटींची मालमत्ता अवघ्या 5 कोटीत परस्पर विकली! सहकार आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

Samata Patsanstha

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Samata Patsanstha  राज्यातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेवर झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतानाच, सहकार आयुक्तांनी या पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिल्याने संस्थेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.Samata Patsanstha

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्जदार वसंत घोडके यांनी समता पतसंस्थेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. घोडके यांच्या तक्रारीनुसार, संस्थेने त्यांची तब्बल 40 कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या 5 कोटी रुपयांना परस्पर विकली. याप्रकरणी घोडके यांच्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या संचालकांसह सात जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Samata Patsanstha



याशिवाय, कर्जदार संजय मोरे, ओमप्रकाश खके आणि वसंत घोडके यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत सहकार आयुक्तांनी समता पतसंस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. समता पतसंस्थेच्या राज्यातील 30 शाखांमध्ये 1100 कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. संस्थेवर झालेल्या या आरोपांमुळे ठेवीदारांमध्ये सध्या संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

राजकीय षडयंत्र असल्याचा संचालकांचा दावा

पतसंस्थेवर होणारे हे सर्व आरोप चेअरमन संदीप कोयटे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. कोयटे यांनी या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला आहे. संदीप कोयटे म्हणाले, सभासदांचा संस्थेवर पूर्ण विश्वास आहे. संस्थेचे संस्थापक काकासाहेब कोयटे हे कोपरगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याने हे आरोप केवळ राजकीय षडयंत्रातून केले जात आहेत. कुठलीही चौकशी झाली तरी आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत.

नगराध्यक्ष निवडणुकीत मुद्दा गाजणार

समता पतसंस्थेचे संस्थापक काकासाहेब कोयटे हे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असून, ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने कोपरगाव नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. संचालकांवर दाखल झालेले गुन्हे आणि सहकार विभागाने लावलेली चौकशी यामुळे कोपरगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

येत्या 20 तारखेला मतदान पार पडणार असून, पालिका निवडणुकीत काका कायटे आणि इतर प्रतिस्पर्धी गटांमधील (काळे आणि कोल्हे यांच्यातील) संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचा हा मुद्दा निवडणुकीत जोरदारपणे गाजणार हे निश्चित आहे.

Samata Patsanstha Corruption Charges 40 Crore Property Sold Cooperative Commissioner Probe Photos Videos Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात