गांधी आश्रम मध्ये सलमान खानने जमिनीवर बसून चरखा देखील चालवला.त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.Salman Khan arrives at Gandhi Ashram for promotion of ‘Antim’
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान हा नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतो. सलमान खानचे अनेक चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत. सध्या तो त्याच्या ‘अंतिम ‘ या सिनेमाचं प्रमोशन करत आहे.या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये आला आहे.
अंतिम सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तो गांधी आश्रमात पोहोचला होता. गांधी आश्रम मध्ये सलमान खानने जमिनीवर बसून चरखा देखील चालवला.त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.दरम्यान नुकताच हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
याआधी सलमान खानच्या ‘अंतिम ‘ सिनेमाच्या पोस्टरला चाहत्यांनी दुग्धाभिषेक केल्याचं समोर आलं होतं. मात्र चाहत्यांच्या या कृत्यामुळे सलमान खान भडकला होता.तेव्हा सलमान खान म्हणाला होता की, अशी नासाडी करू नका तर ते गरीबांना द्या असा सल्ला सलमानने आपल्या चाहत्यांना दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App