Sadavarte : सदावर्तेंचा हल्लाबोल- मराठा आरक्षणाचा जीआर म्हणजे व्हायरस, कॅबिनेट बैठकीत शासन निर्णय मागे घ्यावा!

Sadavarte

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sadavarte राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला. त्यानंतर मराठा आंदोलकांनी मुंबई सोडली. मनोज जरांगे यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. त्यानंतर आता या जीआरवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील पत्रकार परिषद घेत हा जीआर म्हणजे व्हायरस असल्याची टीका केली आहे.Sadavarte

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मी सन्माननीय भुजबळ साहेबांचे स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. छगन भुजबळांनी संवैधानिक गांभीर्य दाखवले आहे. किती जातीवादी झालो आपण? विरोधातले आमदार, खासदार आणि सत्तेतील मराठा मंत्री, आमदार व खासदार सगळे जातीच्या आधारावर ठरवत असतील, त्यांना दुसऱ्या कोणाचे ऐकायचे देखील नसेल तर भारताचा संविधानच कशाला पाहिजे? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.Sadavarte

कुणबीचा डिक्शनरी अर्थ हा शेतकरी असा आहे

पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, कुणबी कोण आहे, हे तरी लक्षात घ्या. कुणबीचा डिक्शनरी अर्थ हा शेतकरी असा आहे. मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळात शेतकऱ्याला कुणबी म्हटले जायचे, बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून शेतीशी संबंधित तो माणूस आहे. परंतु, आपण हे सगळे बदलून टाकायला निघालो आहोत. आपण काय करायला निघालात? संविधानाचे तीनतेरा वाजवण्याचे काही कारण नाही.Sadavarte



मराठा आरक्षणाचा हा शासन निर्णय म्हणजे व्हायरस

मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत, घेरु नका. आम्हाला माहीत आहे शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण दरेगावला नेहमीच जात असता, जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतो. परंतु, आपण दरेगावला जाऊन ओबीसींची वाट लागावी, असे आपल्याकडून कधीच अपेक्षित नाही आणि कधीच अपेक्षित राहणार नाही. मी एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो, कालचा शासन निर्णय हा व्हायरस आहे, आजच्या कॅबिनेट बैठकीत हा शासन निर्णय आपण मागे घ्यावा, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

जरांगे यांना गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णयाचे चॉकलेट

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, सरकारला संभ्रम अवस्था निर्माण करायची, आमदार-खासदार मराठा समाजाचे आहेत, मराठवाड्यातले आहेत, ते चॉकलेट वाटण्यासारखे प्रमाणपत्र देतील. पण, मराठा बांधव मागासलेले नाहीत, वडारी दगड फोडतो, त्याला मागासलेपण म्हणतात. मंदिरातल्या चाव्या ब्राह्मणांकडे नाही तर मराठ्यांकडे आहेत. जरांगे यांना गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णयाचे चॉकलेट दिले

मराठा बांधव सरसकट ओबीसी होऊ शकत नाही- जयश्री पाटील

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, अशी दडपशाही करून मराठा बांधव सरसकट ओबीसी होऊ शकत नाही. माझ्या बांधवांना हेच सांगणे आहे की तुम्ही अभ्यास करा. माझे मराठा बांधव किती मागे आहेत याचा अभ्यास करा. हे मनोज जरांगे घाणेरडे शब्द वापरतो, माझे मराठा बांधव असे शब्द काढतात का? आई-बहिणी वरून शिव्या देतात का? असा सवाल जयश्री पाटील यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या, हे नीचपणाचे लक्षण आहे. लोकांना पुढे करून बोलायचे की मी घेतल्याशिवाय राहणार नाही, माझ्या समाज बांधवांसाठी मी हे करणारच, अरे तुझ्यातला मी संपव आधी जरांगे. तू कोण आहेस? सांग न की मी संविधानाने घेईल, जे संविधानात आहे तेच मिळणार आहे. आझाद मैदान खाली करायला मी सांगितले होते, बघ तुला खोटा गुलाल उधळायला लावला आणि आझाद मैदान सोडायला लावले, हे असे नाही चालणार, अशा शब्दात जयश्री पाटील यांनी मनोज जरांगे यांना सुनावले आहे.

Sadavarte Calls Maratha Reservation GR a Virus

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात